‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेली १४ वर्ष तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत त्यांना हसवत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. मालिकेतील कलाकारांना या मालिकेतील त्यांच्या भूमिकांमुळे नवी ओळख मिळाली. पण फक्त ओळखच मिळाली असं नाही तर आपापली भूमिका साकारण्यासाठी हे कलाकार एका एपिसोडसाठी हजारो रुपये आकारतात. आता या मालिकेतील आत्माराम भिडे ही भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडकर यांच्या मानधनाचा आकडा समोर आला आहे.
या मालिकेतील जेठालाल, तारक मेहता यांच्याप्रमाणेच भिडे यांचाही चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने ते कायमच प्रेक्षकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधून घेत असतात. या मालिकेतील त्यांच्या कामाचं खूप कौतुक होतं. या मालिकेतील एका एपिसोडसाठी ते मोठी रक्कम आकारतात.
हेही वाचा : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’तील ‘चंपक चाचा’ यांना मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान गंभीर दुखापत, निर्माते काळजीत
एका मीडिया रिपोर्टनुसार भिडे यांची भूमिका साकारण्यासाठी मंदार एका एपिसोडसाठी ८० हजार रुपये आकारतात. त्यांचं हे मानधन जेठालाल ही भूमिका साकारत असलेल्या दिलीप जोशी यांच्या मानधनापेक्षाही जास्त आहे. त्यांच्या मानधनाचा आकडा समोर आल्यावर सर्वजण अवाक् झाले आहेत.