‘बिग बॉस’चं १७वं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आहे. या पर्वाची थीम बदलल्यामुळे यंदाच्या पर्वाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या पर्वाच्या सुरुवातीपासून स्पर्धकांनी बिग बॉस घर अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. पहिल्या दिवसापासून घरात वादाला सुरुवात झाली आहे. सध्या या बिग बॉसच्या घरात सतत कपल्समध्ये भांडण होताना पाहायला मिळत आहे. अंकिता लोखंडे-विकी जैन विरुद्ध ऐश्वर्या शर्मा-निल भट्ट असं चित्र निर्माण झालं आहे. अशातच आता दिवाळीचं औचित्य साधून बिग बॉस घरात मोठा धमाका होणार आहे. लवकरच आणखी दोन स्पर्धकांची वाइल्ड कार्ड एंट्री होणार आहे. यामध्ये सुरुवातीपासून बिग बॉसमध्ये असलेल्या एका स्पर्धकांच्या पत्नीचा समावेश आहे. त्यामुळे आता शोमध्ये आणखी एक कपल झळकणार असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा – ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने घेतला प्रेक्षकांचा निरोप; सविता मालपेकरांची झाली एंट्री

Bigg Boss 18 Fame Rajat Dalal talk about chahat pandey and controversy
Video: चाहत पांडेचं नाव ऐकताच रजत दलालने जोडले हात, विनंती करत म्हणाला…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Bigg Boss 18 Chum Darang Talking In Marathi Language Video Viral
Bigg Boss 18: “खूप छान…”, चुम दरांगने मराठीत साधला संवाद, विवियन डिसेनाच्या सक्सेस पार्टीबद्दल म्हणाली…
vivian dsena first reaction after karenveer mehra won bigg boss 18
करणवीर मेहरा Bigg Boss 18 चा विजेता ठरल्यावर विवियन डिसेनाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “त्याच्या…”
Bigg Boss 18 Salman Khan announced Karan Veer Mehra as a winner Chum darang and Shilpa Shirodkar became happy
Bigg Boss 18: सलमान खानने करणवीर मेहराचं नाव घेताच चुम, शिल्पाला झाला आनंद; बाकी सदस्यांच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग, पाहा व्हिडीओ
Bigg Boss 18 Grand Finale Winner Karanveer Mehra
Bigg Boss 18 Winner : ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता ठरला करणवीर मेहरा
Bigg Boss 18 Vivian Dsena angry on karan veer Mehra roasting
Bigg Boss 18: दोन वर्षांच्या मुलीवरून खिल्ली उडवल्यामुळे विवियन डिसेना भडकला करणवीर मेहरावर, रागातच्या भरात केलं ‘हे’ कृत्य
Bigg Boss 18 Grand Finale Karan Veer Mehra Vivian Dsena Perform with Shilpa shirodkar
Bigg Boss 18: “ये बंधन तो…”, करण-विवियनचा शिल्पासह जबरदस्त परफॉर्मन्स, बहीण नम्रता शिरोडकर म्हणाली…

‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचे दोन आठवडे होताच पहिल्या दोन वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एंट्री झाली. अभिनेत्री व पूर्वाश्रमीची मिस इंडिया मनस्वी ममगई आणि इशा मालवियाचा सध्याचा बॉयफ्रेंड, अभिनेता समर्थ जुरेल यांनी अचानक बिग बॉस घरात प्रवेश केला. यामुळे संपूर्ण घरचं वातावरण चांगलंच तापलं होतं. आता लवकरच सलमान खानच्या या लोकप्रिय शोमध्ये युट्यूबर राघव शर्माची एंट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे. एल्विश यादव व अभिषेक मल्हानप्रमाणे राघव देखील खूप लोकप्रिय युट्यूबर आहे.

हेही वाचा – रांगोळीत रंग भरून, केक कापून अन्…., ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकारांनी ‘असा’ केला साजरा शूटिंगचा शेवटचा दिवस

याशिवाय छोट्या पडद्यावरील या वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोमध्ये धमाका करायला तेहेलका भाई उर्फ सनी आर्यच्या पत्नीची एंट्री होणार आहे. दीपिका आर्य दिवाळीच्या मुहूर्तावर बिग बॉस घरात प्रवेश करणार असल्याचं समोर आलं आहे. दीपिका ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचा दबंग अंदाज सतत पाहायला मिळत असतो. अशातच जर दीपिकाने बिग बॉसमध्ये एंट्री केली तर आणखी कपल घरात पाहायला मिळेल.

हेही वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली…

दरम्यान, सध्या बिग बॉसच्या घरात फक्त कपल्समध्येच नाही तर इतर स्पर्धकांमध्ये देखील सतत भांडणं होतं आहेत. दरदिवशी कोणाची ना कोणाची तरी भांडणं पाहायला मिळत आहेत. नुकतीच वाइल्ड एंट्री झालेली मनस्वी घराबाहेर झाली. आता या आठवड्यात कोण घराबाहेर होणार? हे येत्या शनिवारच्या भागात स्पष्ट होईल.

Story img Loader