‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे. मालिकेत आता मुक्ता-सागरचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात सुरू आहे. त्यामुळे मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. लवकरच मुक्ता-सागरचा संगीत सोहळा सुरू होणार आहे. पण या संगीत सोहळ्यात गोखले कुटुंबाला इंगा दाखवण्यासाठी कोळी कुटुंबाचा एक नवा डाव पाहायला मिळणार आहे. या नव्या डावामुळेच मुक्ता-सागरच्या संगीत सोहळा आणखी रंगतदार होणार आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कालच्या भागात मुक्ता-सागरचा मेहंदी सोहळा पाहायला मिळाला. यावेळी सईने सागरच्या हातावर मेहंदी काढली. मुक्ताचा ‘एम’ आणि सागरचा ‘एस’ असं इंग्रजी अक्षर सईने सागरच्या हातावर काढलं. अशाप्रकारे गोखले व कोळी कुटुंबातील मेहंदी सोहळा निविर्घ्नपणे पार पडताना पाहायला मिळाला. त्यानंतर सई मुक्तासाठी खास सरप्राइज देताना दिसली. सईने स्वतःच्या हाताने मुक्तासाठी सर्वोत्कृष्ट आईची ट्रॉफी तयार केली होती. जी पाहून मुक्ता भावुक झाली.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आमच्याकडे मान-अपमान मनात होतो अन् त्याचं संगीत…”, देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी!
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
saleel kulkarni shared special post for daughter Ananya on her birthday
“प्रत्येक जन्मी मला तुझा बाबा होऊ दे”, सलील कुलकर्णींची लेकीसाठी सुंदर पोस्ट, म्हणाले, “माझ्या जीवाची सावली…”
The song Yellow Yellow from the movie Fasklass Dabhade is released
‘फसक्लास दाभाडे’मधील ‘यल्लो यल्लो’ गाणं प्रदर्शित
Director and artist Pravin Tarde gifted novel Fakira to Gautami Patil
दिग्दर्शक आणि कलाकार प्रविण तरडे यांनी गौतमी पाटील यांना ‘फकिरा’ कादंबरी दिली भेट
chinchwad music program of bela shende
भक्तिगीते, युगुलगीते, लावणी, चित्रपटगीतांनी रंगली सुरांची मैफिल
bahiram yatra festival
प्रसिद्ध बहिरम यात्रेला सुरुवात! काय आहे परंपरा आणि इतिहास?

हेही वाचा – Video: ‘नवा गडी नवं राज्य’ २३ डिसेंबरला घेणार प्रेक्षकांचा निरोप; शूटिंगचा शेवटचा दिवस कलाकारांनी ‘असा’ केला साजरा

या सगळ्या नाट्यानंतर आता लवकरच मुक्ता-सागरच्या संगीत सोहळा सुरू होणार आहे. या संगीत सोहळ्यासाठी ‘स्टार प्रवाह’च्या परिवारातील अनेक सदस्य हजेरी लावला आहेत. एवढंच नाही तर त्यांचा डान्स देखील पाहायला मिळणार आहे. पण यादरम्यान कोळी कुटुंब नवा डाव रचणार आहेत.

संगीत सोहळा गोखले कुटुंबाप्रमाणे होत असल्यामुळे लकी, कोमल आणि कोळी कुटुंबातील सदस्य नाराज होतात. त्यामुळे इंद्रा एक शक्कल लढवते. सरबतामध्ये दारू मिसळते. त्यानंतर गोखले कुटुंबाला प्रसाद सांगून ती सगळ्यांना प्यायला भाग पाडताना दिसणार आहे. यामुळेच मुक्ता-सागरच्या संगीत सोहळ्यात बरीच मज्जा पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – “रणबीरला पहिल्यांदा भेटलो तेव्हा…” उपेंद्र लिमयेंनी सांगितला किस्सा; म्हणाले, “अहंकार…”

दरम्यान, मुक्ता-सागरचा आतापर्यंतचा लग्नसोहळा निर्विघ्नपणे पार पडताना दिसला. पण जेव्हा सावनीला कळेल की मुक्ता सागरशी लग्न करतेय, तेव्हा ती काय नवा गोंधळ घालणार? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

Story img Loader