Tejashri Pradhan Post: मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकताट मोठा निर्णय घेतला. सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मधून बाहेर पडण्याचा निर्णय तेजश्रीने घेतला आहे. त्यामुळे तेजश्रीच्या चाहत्यांसह मालिकेच्या प्रेक्षकांना धक्का बसला आहे. सर्वजण नाराजी व्यक्त करत आहे. अशातच तिने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला रामराम केल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तेजश्रीची ही पोस्ट सध्या खूप व्हायरल झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ताची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका चांगलीच गाजली. जान्हवी, शुभ्राप्रमाणे तेजश्रीने साकारलेली मुक्ता भूमिका घराघरात पोहोचली. पण, आता ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ताच्या भूमिकेत तेजश्री दिसणार नाहीये. तिच्या जागी मराठीसह हिंदी मालिकाविश्वात झळकलेली अभिनेत्री स्वरदा ठिगळे पाहायला मिळणार आहे. नुकतीच तेजश्रीने एक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – Video: लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत साजरी करण्यासाठी पूजा सावंत लागली तयारीला, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “वेध…”

तेजश्रीने पिवळ्या रंगाच्या साडीमधील एक फोटो शेअर करत लिहिलं की, चिअर्स…काही वेळेला बाहेर पडणं गरजेचं असतं. तुमची कुवत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा. कारण हे तुमच्यासाठी कोणीही करणार नाही.

हेही वाचा – Bigg Boss 18: रजत दलालच्या चुकीमुळे ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

तेजश्रीच्या या पोस्टवर काही चाहत्यांनी मालिका का सोडली? यामागचं कारण विचारलं आहे. तर काहींनी तेजश्रीने घेतलेल्या निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा – रेश्मानंतर ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने शिवानी-अंबरचं थाटामाटात केलं केळवण! कलाकारांनी शेअर केले Inside व्हिडीओ

नवीन मुक्ता कोण आहे?

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता म्हणून लवकरच पाहायला मिळणाऱ्या स्वरदा ठिगळेने २०१३ साली ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. यानंतर ती हिंदी मालिकेत झळकली. तिने ‘सावित्री देवी कॉलेज’ या हिंदी मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर तिने ‘प्यार के पापड’ या मालिकेतही काम केलं. या दोन हिंदी मालिकेनंतर ती पुन्हा मराठी मालिकेत झळकली. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत तिने ताराराणी यांची भूमिका उत्तमरित्या साकारली. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता. गेल्या वर्षी स्वरदा लग्नबंधनात अडकली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejashri pradhan first post share after exit premachi goshta serial pps