‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजश्री प्रधान सध्या मराठी इंडस्ट्रीतील आघाडी अभिनेत्री झाली आहे. तिच्या प्रत्येक मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत असतं. तिने साकारलेली जान्हवी जितकी प्रेक्षकांना आवडली तितकीच ‘अग्गंबाई सासूबाई’मधील शुभ्रा आणि आता ‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ता प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतील पडली आहे. तेजश्रीची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर आहे.

तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेबरोबर विविध चित्रपटांमध्ये दिसत आहे. तेजश्रीचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपट आजच, २० डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. आनंद गोखले दिग्दर्शित ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटात तेजश्री गायत्रीच्या भूमिकेत झळकली आहे. या चित्रपटात तेजश्रीसह अभिनेता सुबोध भावे, शर्मिष्ठा राऊत, अर्चना निपाणकर, उदय नेने, संजय खापरे, प्रदीप वेलणकर अशी बरीच तगडी कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

हेही वाचा – “लग्नसंस्थेत मुलीच्या त्यागाची गोष्ट मोठी, मुलांना…”, सुबोध भावेचं वक्तव्य, म्हणाला, “लग्न ही कायमच ज्वलंत समस्या…”

‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटाच्या निमित्ताने तेजश्री प्रधान विविध एंटरटेनमेंट चॅनेलशी संवाद साधताना दिसत आहे. यावेळी तिने ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील एक गोष्ट जपून ठेवल्याचा खुलासा केला. ही गोष्ट दुसरी-तिसरी कोणती नसून मालिकेतील तिचं मंगळसूत्र आहे.

हेही वाचा – अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”

‘तारांगण’ युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना तेजश्री प्रधान म्हणाली, “‘मी होणार सून मी ह्या घरची’ मालिका करत होते, तेव्हा जान्हवीचं मंगळसूत्र खूप लोकप्रिय झालं होतं. अफाट लोकप्रियता त्या मंगळसूत्राला मिळालीये. आजही कुठल्याही ज्वेलरी शॉपमध्ये गेलं तरी त्याबद्दल बोललं जातं. त्यामुळे ते मंगळसूत्र खूप लोकप्रिय झाल्याने मला ते माझ्याकडे ठेवायचं असं ठरवलं. कारण आयुष्यातली पहिली लोकप्रिय झालेली ही गोष्ट होती. तर मी ‘मी होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील मंगळसूत्र जपून ठेवलंय.”

हेही वाचा – Bigg Boss 18: फिनालेच्या चार आठवड्यांआधी अचानक ‘हा’ सदस्य घराबाहेर; शिल्पा शिरोडकर, ईशा सिंहला अश्रू झाले अनावर

दरम्यान, तेजश्री प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं झालं, ती मराठीसह हिंदीत काम करत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या ‘दर्मियान’ नावाच्या चित्रपटाची स्क्रिनिंग झाली. मणिकर्णिका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तेजश्रीचा हा चित्रपट दाखवण्यात आला होता. तसंच २०२४मध्ये तेजश्री प्रधान बऱ्याच मराठी चित्रपटात पाहायला मिळाली.

Story img Loader