‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. कारण मालिकेत लग्नाची धामधुमी पाहायला मिळत आहे. सईच्या प्रेमाखातर मुक्ता-सागर लग्नाला तयार झाले आहेत. त्यामुळे साग्र संगीत लग्न करण्यासाठी गोखले-कोळी कुटुंबाने जय्यत तयारी केली आहे. गोखले कुटुंबाच्या रितीरिवाजानुसार मुक्ता-सागरचं लग्न करायचं ठरलं असलं तरी दोन्ही कुटुंबाच्या पद्धतीने लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. आज मुक्ता-सागरचा साखरपुडा होणार आहे. त्यानंतर मेहंदी, हळद, सप्तपदी, असं समारंभपूर्वक लग्नसोहळा होणार आहे. अशातच देण्याघेण्यावरून गोखले-कोळी कुटुंबात पुन्हा वाद होणार आहे. याचा व्हिडीओ नुकताच समोर आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कालच्या भागात साखरपुड्याचा मुहूर्त ओलांडून गेला असतो तरी देखील सागर गायब असतो. सगळेजण सागरच्या शोधात असतात. तर मुक्तासह गोखले कुटुंब चिंतेत असतं. पुन्हा एकदा लेकीचा तिसरा साखरपुडा मोडणार की काय अशी शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकतं असते. पण आजच्या भागात मिहिर सागरला घेऊन येतो, असं पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मुक्ता-सागरचा साखरपुडा पार पडतो. मात्र, त्यानंतर देण्याघेण्यावरून पुन्हा एकदा गोखले-कोळी कुटुंबात वाद होतो.

two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Somnath Suryawanshi Mother
Somnath Suryawanshi Mother : राहुल गांधींच्या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा साश्रू नयनांनी दावा, “माझ्या मुलाला मारहाण करुन त्याचे…”
love became mistake chatura
आयुष्याची घडी विस्कटवणारी वादळवाट…
saleel kulkarni shared special post for daughter Ananya on her birthday
“प्रत्येक जन्मी मला तुझा बाबा होऊ दे”, सलील कुलकर्णींची लेकीसाठी सुंदर पोस्ट, म्हणाले, “माझ्या जीवाची सावली…”
Interesting story of father-son relationship Shri Ganesha movie Milind Kavade
बापलेकाच्या नात्याची रंजक गोष्ट
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”

हेही वाचा- “नवऱ्याबरोबर बिग बॉसमध्ये जाऊ नकोस”, चाहतीने सोनाली कुलकर्णीला दिला सल्ला, अभिनेत्री म्हणाली, “एकटी…”

‘सीरियल जत्रा’ या इन्स्टाग्राम पेजवर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत पुढील भागात काय होणार? याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये देण्याघेण्यावरून दोन्ही कुटुंबात वाद होताना पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला गुरुजी म्हणतात की, देणीघेणी? यावर मुक्ताची आई म्हणते की, खरंतर आम्ही त्यांना काळजाचा तुकडाच देतोय. लगेच सागरची पण आई म्हणते, “मी पण माझ्या सोन्यासारखा एक नंबरी पोरगा तुम्हाला देतेय जावई म्हणून…” त्यानंतर मुक्ताची आई म्हणते, “मुक्ता तुमच्याकडे आल्यानंतर ती आई-वडील म्हणून तुमच्याकडेच बघणार आहे. तुमच्याबरोबर हसेल, खेळेल, जेवेल” यावर सागरची आई म्हणते, “माझी पोर-बाळ काय खातील. तेच मी तिला खायला घालीन.” हे ऐकून मुक्ताची आई संतापून उठते आणि म्हणते, “नाही…नाही…मुक्ता त्या घरात जाऊन मासांहारी खाणार नाही.”

दरम्यान, आज मुक्ता-सागरचा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडणार आहे. पण जेव्हा सावनीला सागर मुक्ताशी लग्न करतोय हे कळल्यानंतर ती काय नवा डाव आखते? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

Story img Loader