मराठी मालिकाविश्वातील आघाडीची अभिनेत्री तेजश्री प्रधान नेहमी चर्चेत असते. तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच तिची कोणतीही भूमिका असो ती सुपरहिट ठरतेच. काही महिन्यांपूर्वी तेजश्रीने लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्काच बसला. तेजश्रीने अचानक ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका का सोडली? असे बरेच प्रश्न उपस्थित होऊ लागले. पण, अद्यापही यामागचं कारण समोर आलेलं नाही. सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्रीच्या जागी अभिनेत्री स्वरदा ठिगळे पाहायला मिळत आहे. तेजश्रीने मालिका सोडून दोन महिने उलटले आहेत. पण, मालिकेतील कलाकारांबरोबर तिचं असलेलं सुंदर नातं अजूनही कायम टिकून आहे.

नुकतीच तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील कलाकारांबरोबर ग्रेट भेट झाली. याचे फोटो ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचे दिग्दर्शक विघ्नेश कांबळे आणि तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. गुरुवारी २० मार्चला तेजश्री योगेश केळकर ( पुरुषोत्तम कोळी ), आयुष भिडे ( लकी ), कोमल सोमारे ( स्वाती ) आणि दिग्दर्शक विघ्नेश कांबळे यांना भेटली. यावेळी या पाच जणांनी खूप एन्जॉय केलं.

या ग्रेट भेटीत अमृता बने ( मिहिका ) आणि राजस सुळे ( मिहीर ) नव्हते. त्यामुळे विघ्नेश यांनी फोटो शेअर करत अमू, राजस मिस यू असं लिहिलं आहे. तसंच तेजश्री प्रधानने या भेटीची फोटो शेअर लिहिलं की, आनंदी चेहऱ्यांसह आनंदी गुरुवार. तेजश्री व ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील कलाकारांच्या या भेटीचे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.

दरम्यान, तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेवर मोठा परिणाम झालेला दिसला. तेजश्रीने सोडल्यानंतर मालिकेच्या टीआरपीत मोठी घसरण झाली. टीआरपीच्या यादीत दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर असणारी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका थेट पाचव्या स्थानावर गेलेली पाहायला मिळाली. तसंच काही दिवसांनी मालिकेची वेळ बदलण्यात आली. प्राइम टाइम असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या ६.३० वाजता प्रसारित होतं आहे.

तेजश्री प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे. तिने मालिकेला रामराम केल्यानंतर श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट दिली होती. या आश्रमातील तेजश्रीचे फोटो व्हायरल झाले होते. याशिवाय ती निर्सगरम्य वातावरणात फिरत आहे. तसंच इंडस्ट्रीतील कलाकारांच्या भेटीगाठी घेताना पाहायला मिळत आहे.

Story img Loader