अभिनेत्री तेजश्री प्रधान दोन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतत आहेत. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतून तेजश्रीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यामुळे प्रेक्षकांना तिच्या नव्या मालिकेची उत्सुकता होती. आता तेजश्रीच्या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा प्रोमो पाहून काही नेटकरी नाराज आहेत, तर काही नेटकरी तिला पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील नव्या कोऱ्या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ असं या मालिकेचं नाव आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे; ज्याला नेटकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. पण, काही नेटकऱ्यांनी तेजश्रीच्या नव्या मालिकेच्या प्रोमोवर टीका केली आहे.

हेही वाचा – करण जोहरच्या वेब सीरिजमध्ये झळकणार मराठी मालिकाविश्वातील ‘हा’ लोकप्रिय अभिनेता

हेही वाचा – ज्येष्ठ अभिनेत्याने शशांक केतकरवर केलेली टीका; अनुभव सांगत म्हणाला, “अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले…”

एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, “ये है मोहब्बतें या हिंदी मालिकेचं मराठी व्हर्जन आहे.” तर दुसऱ्या नेटकरीनं लिहिलं आहे की, “हे प्रवाहवाले फक्त हिंदी मालिकेची कॉपी करत आहेत. ही मालिका ‘ये है मोहब्बतें आहे’.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “बेक्कार प्रोमो आहे. लाडे लाडे बोलणारी तेजश्री प्रधान, हॉट हिरो आणि त्याची ती गोड छोटी मुलगी. किती वर्षे तुम्ही हेच आणि हेच दाखवणार आहात? नवीन विषय काहीच सुचत नाही का हो तुम्हाला?”

तेजश्रीच्या या नव्या मालिकेच्या प्रोमोला जरी नकारात्मक प्रतिक्रिया आल्या असल्या तरी तेवढ्याच सकारात्मक प्रतिक्रियाही तिच्या चाहत्यांनी दिल्या आहेत. एका नेटकरीनं लिहिलं आहे की, “अखेर ‘रंग माझा वेगळा’ संपत आहे, याचा आनंद आहे. तसेच खूप आनंद यासाठी होत आहे की, तेजश्री प्रधानला पुन्हा पाहायला मिळत आहे. पण थोडं वाईट यासाठी वाटतं आहे की, मालिकेची कथा खूप कॉमन आहे. यावर आधीपण मालिका झाल्या आहेत, पण जाऊ द्या. तेजश्री आहे म्हणजे मालिका हिटच होणार.” दुसऱ्या नेटकरीनं लिहिलं आहे की, “खूप छान प्रोमो, सर्व कलाकार एवढे उत्तम आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी सर्वोत्तम बघायला मिळेल, याची खात्री वाटत आहे. तेजश्री खूप विचारपूर्वक मालिका करते. त्यामुळे ही मालिका लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार…खूप शुभेच्छा आणि प्रेम.”

हेही वाचा – अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘ओह माय गॉड २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलणार? जाणून घ्या कारण

दरम्यान, स्टार प्रवाहच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या नव्या मालिकेत तेजश्री व्यतिरिक्त अभिनेता राज हंसनाळे, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ४ सप्टेंबरपासून रात्री ८ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejashri pradhan new serial premachi goshta promo out pps