‘स्टार प्रवाह’वरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला मुक्ता-सागरच्या लग्नानंतर एक रंजक वळण आलं आहे. त्यानंतर आता एक आनंदाची गोष्ट घडली आहे. सईची कस्टडी कोर्टाने मुक्ताकडे दिली आहे. त्यामुळे मुक्ता-सागरसह कोळी, गोखले कुटुंब खूप आनंदात आहेत. दोन्ही कुटुंब सईचं जोरदार स्वागत करताना दिसणार आहे. यादरम्यान मुक्ताचे सागरबाबतीतले अनेक गैरसमज दूर होताना पाहायला मिळणार आहे. पण यानंतर हर्षवर्धन नवा डाव रचणार आहे. ज्याला सागर बळी पडून सईला वाईट वागणूक देताना दिसणार आहे. मात्र याचा मुक्ता सागरला चांगलाच इंगा दाखवते.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कालच्या भागात हर्षवर्धन, सावनी, सागर, मुक्ता यांचं नाट्य पाहायला मिळालं. त्यानंतर आता सईचं कोळी कुटुंबात स्वागत होणार आहे. मुक्ताने सईसाठी खास गाजराचा हलवा केला आहे. सईच्या येण्याने कोळी कुटुंबात आनंदमय वातावरण झालं आहे. यादरम्यान मुक्ताने सईमध्ये केलेला बदल पाहून इंद्रा म्हणजे सागरची आई नाराज झालेली पाहायला मिळणार आहे. पण घरातील इतर लोक मुक्ताने सईला दिलेली आईसारखी वागणूक पाहून आनंदी होणार आहेत. यानंतर सागरच्या मित्राच्या पार्टीतलं नाट्य पाहायला मिळणार आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

हेही वाचा – ‘पांडू हवालदार’पूर्वी अशोक सराफ यांनी का घेतला होता चार वर्षांचा ब्रेक? जाणून घ्या…

सागरच्या मित्राच्या पार्टीत हर्षवर्धन व सावनी देखील हजेरी लावणार आहेत. याच पार्टीत हर्षवर्धनचा नवा डाव पाहायला मिळणार आहे. जेव्हा सागर पूर्णपणे नशेत असतो तेव्हा हर्षवर्धन त्याला खोटं सांगतो की, सई ही माझी मुलगी आहे. जरी ती तुझ्याकडे राहत असली तरी सई हर्षवर्धन अधिकारी आहे. हे ऐकून सागर संतापतो आणि त्याला खरं वाटतं. हर्षवर्धन व सागरचं बोलणं मागून सावनी ऐकत असते. तेव्हा ती हर्षवर्धनला विचारते, “तू सागरबरोबर का खोटं बोललास?” त्यावर हर्षवर्धन म्हणतो, “हा तर माझा नवा डाव आहे.”

हर्षवर्धनचं बोलणं ऐकून सागर मुक्ताला पार्टीत एकटचं सोडून घरी निघून जातो. तेव्हा तो खूप नशेत असतो. मग मुक्ताला सावनी, हर्षवर्धन घरी सोडतात. सागर घरी आल्यावर सई त्याला विचारते की, मुक्ता आई कुठे आहे? तेव्हा सागरला हर्षवर्धनने सांगितलेली गोष्ट आठवते आणि तो सईला जोरात ढकलून देतो. तितक्यात मुक्ता येऊन सईला पडताना वाचवते. सागरने सईला दिलेली वागणूक पाहून मुक्ताला धक्का बसतो. ती सागरला चांगलाच जाब विचारते. मुक्ता म्हणते, “माझ्या मुलीला हात लावायची हिंमत कशी झाली तुमची? माझ्या मुलीला हात जरी लावलात ना, तोच हात तोडून तुमच्या दुसऱ्या हातात देईन.” मालिकेचा हा प्रोमो ‘मराठी टीव्ही इन्फो’ या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Video: मेहंदी सोहळ्यात आमिर खानच्या जावयाचा ‘या’ मराठी कलाकारांसह जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहिलात का?

दरम्यान, मुक्ता-सागरच्या लग्नामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा टीआरपी चांगलाच वाढला आहे. मागील आठवड्याच्या ऑनलाइन टीआरपीच्या यादीत ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका पहिल्या स्थानावर होती. तर टेलिव्हिजन टीआरपीच्या यादीत मालिका दुसऱ्या स्थानावर होती.

Story img Loader