‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील नवं वळणं चांगलंच सुरू झालं आहे. सईच्या प्रेमापोटी मुक्ता-सागर लग्नबंधनात अडकले असून आता दोघांमधील प्रेम कसं खुलणार? हे पाहायला मिळणार आहे. तसेच मुक्ता-सागरच्या लग्नानंतर एक आनंदाची गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे सईची कस्टडी मुक्ताला मिळणार आहे. त्यामुळे कोळी-गोखले कुटुंबात आनंद पाहायला मिळणार आहे. पण मुक्ताचा सासरचा पहिला दिवस कसा असणार आहे? हे जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कालच्या भागात हनिमूनच्या पहिल्या रात्री झालेला मुक्ताचा गैरसमज दूर होतो. सागरला बासुंदी प्यायल्याने जुलाबचा त्रास होत असल्याचं तिला समजतं. त्यामुळे मुक्ता सागरला जुलाबाच्या त्रासावरची गोळी देते. पण सागर ती घेत नाही. नंतर तो मिहिरला घरातून गोळी आणायला सांगतो. तर दुसरीकडे मुक्ता सागरच्या काळजीपोटी मिहिकाला ताक घेऊन यायला सांगते. त्यानंतर मिहिर आणि मिहिका एकत्र मुक्ता-सागरने सांगितल्याप्रमाणे गोळी, ताक घेऊन येतात. पण मिहिका चुकून ताकाऐवजी दूध आणते. यामुळे पुन्हा सागर मुक्ताशी भांडतो. अशा भांडणातच मुक्ता-सागरचा हनिमून होती. दुसऱ्यादिवशी उठतात तेव्हा सागरच्या लक्षात येतं की चुकून त्याच्या बॅग ऐवजी मामाची बॅग आणली आहे. त्यावरून मुक्ता-सागरमध्ये छोटे वाद होतात.

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये शालिनी शिर्के-पाटीलचं दमदार पुनरागमन, नव्या रुपात अन् नव्या मनसुब्यात

या सगळ्या नाट्यानंतर दोघं घरी येतात. तेव्हा सागरच्या मामाला त्याची बॅग पाहून आनंद होतो आणि तो त्याच्या घरी निघून जातो. यानंतर कोमल मुक्ताला सागरच्या खोलीत घेऊन जाते. मग पुन्हा मुक्ता-सागरचे वाद पाहायला मिळणार आहेत. सामान ठेवण्यापासून ते बाथरूमपर्यंत अशा विषयावरून मुक्ता-सागरमध्ये वाद होणार आहेत. पण शेवटी मुक्ता बाथरूमच्या वादानंतर स्वतःच्या घरी अंघोळ करायला जाते. त्यानंतर मुक्तासाठी नाश्त्याला कोळी कुटुंबाने खास ऑम्लेट पाव बनवलेला असतो. हे पाहून मुक्ताला आश्चर्याचा धक्का बसतो. मुक्ता शुद्ध शाकाहारी असते, त्यामुळे ती ऑम्लेट पाव खायला नकार देते. हे पाहून बापू एक शक्कल लढवतात. ते मुक्ताच्या घरी जाऊन माधवीने (मुक्ताची आई) बनवलेले समोसे घेऊन येतात आणि मुक्ताला खायला देतात. यानंतर मुक्ता क्लिनिकल जाते तेव्हा तिला सागरची आई कोर्टात वेळेवर यायला सांगते. कारण सईच्या कस्टडीची सुनावणी असते. असा मुक्ताचा सासरचा पहिला दिवस असतो.

हेही वाचा – Video: ‘या’ अभिनेत्रीने वडिलांच्या आजारपणामुळे सोडली लोकप्रिय मालिका, भावुक व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

दरम्यान, सईच्या कस्टडीच्या सुनावणी दरम्यान मोठं नाट्य घडणार आहे. हर्षवर्धनने रचलेला डाव कसा त्याच्यावरच उलटतो आणि सईची कस्टडी अखेर मुक्ताला कशी मिळते, हे पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejashri pradhan premachi goshta mukta first day of sasar pps