अखेर मुक्ता-सागर लग्नबंधनात अडकले आहेत. सावनीचा डाव हाणून पाडून मुक्ता सागरने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता मुक्ता-सागरच्या प्रेमाची गोष्टीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. सईच्या प्रेमाखातर दोघांनी लग्न केलं असलं तरी कालांतराने दोघांमधील जवळीक कशी वाढते? एकमेकांविषयी प्रेम कसं निर्माण होतं? यादरम्यान होणाऱ्या मजेशीर गोष्टी हे सर्वकाही येत्या काळात पाहायला मिळणार आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कालच्या भागात मुक्ता-सागरचा लग्नसोहळा पार पडला. मंगलाष्टका, सप्तपदी, कन्यादान, सुनमुख पाहणे असं सर्व काही पाहायला मिळालं. सावनीच्या रुपाने आलेलं विघ्न मुक्ताच्या नाटकाने सहज दूर झालं आणि अखेर मुक्ता-सागरची लग्नगाठ बांधली. वाजत-गाजत आता मुक्ताचा कोळी कुटुंबात गृहप्रवेश होणार आहे.
हेही वाचा – “आणखी दिसायला हॉट, श्रीमंत…”, अभिनेत्री स्पृहा जोशीने सांगितले पुढील पाच वर्षांचे प्लॅन्स, म्हणाली…
आजच्या भागात गोखले कुटुंबाच्या रितीरिवाजानुसार मुक्ताची पाठवणी पाहायला मिळणार आहे. तसेच दोन्ही कुटुंब एकत्र जेवताना दिसणार आहे. यावेळी गोखले कुटुंबाच्या पद्धतीने खास मेजवानी असणार आहे. मुक्ता-सागरचा खास उखाणा पाहायला मिळणार आहे. परंतु, यादरम्यान गोखले कुटुंबाच्या पद्धतीनुसार जावयाला गोड पदार्थ खाऊ घालायचं म्हणून मयुरेश-मयुरी सागरला भरपूर बासुंदी खाऊ घालतात. सागरला दुधाची खूप अॅलर्जी असते, हे कोणाच माहित नसतं. शेवटी सागर मुयरेश-मयुरीला थांबवतो. मात्र याचा वाईट परिणाम सागरला हनिमून दरम्यान होतो.
लग्नानंतर मुक्ता-सागर हनिमूनला जातात. त्यावेळेस जास्त प्रमाणात बासुंदी खाल्यामुळे सागरला जुलाबाचा त्रास सुरू होतो. म्हणून तो वेटरला जुलाबाच औषध आणण्यासाठी सांगतो. यादरम्यान मुक्ता खोलीत येते. तेव्हा वेटर सागरच्या औषधांऐवजी कंडोम आणून देतो. यामुळे गडबडचं होते. मुक्ता सागरला कंडोमविषयी विचारते पण सागरला ते समजत नाही तो औषधाविषयी बोलत असतो. यामुळे मुक्ताला पुन्हा एकदा सागरच्या बाबतीत गैरसमज होतो. पण आता हा गैरसमज कसा दूर होणार? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या पुढील भागात नेमकं काय घडणार? याचा व्हिडीओ ‘सीरियल जत्रा’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा – लग्नानंतर गौतमी देशपांडे नवऱ्यासह पोहोचली कोकणात, मराठी सोशल मीडिया स्टारने शेअर केले फोटो
दरम्यान, मुक्ता-सागरच्या लग्नामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या ऑनलाइन टीआरपीमध्ये वाढ झाली आहे. मागील आठवड्याचा ऑनलाइन टीआरपीच्या यादीत ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका पहिल्या स्थानावर आहे. तर ‘ठरलं तर मग’ दुसऱ्या स्थानावर आली आहे.