तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. तेजश्रीने साकारलेली मुक्ता व राजने साकारलेला सागर प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. तसेच मालिकेतील इतर पात्रांनी देखील प्रेक्षकांच्या मनं जिंकली आहेत. त्यामुळे मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अशात या मालिकेला टक्कर देण्यासाठी एक मालिका सज्ज झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आता होऊ दे धिंगाणा २’ या लोकप्रिय शोमध्ये आज व उद्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या टीमला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेची टीम टक्कर देताना पाहायला मिळणार आहे. या अनोख्या सांगीतिक स्पर्धेत कोण बाजी मारतंय? हे येत्या काळात कळेल. पण सध्या या कार्यक्रमातील मुक्ता-सागरच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये मुक्ता सागरसाठी भन्नाट उखाणा घेताना दिसत आहे.

हेही वाचा – “आज लक्ष्या असता तर…” वर्षा उसगांवकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणींना उजाळा देत व्यक्त केली ‘ही’ खंत, म्हणाल्या…

मुक्ता-सागरचा हा व्हिडीओ ‘स्टार सीरियल मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मुक्ता भन्नाट उखाणा घेताना पाहायला मिळत आहे. मुक्ता उखाणा घेत म्हणते, “चांदीच्या ताटात म्हावऱ्याचं तुकडं…चांदीच्या ताटात म्हावऱ्याचं तुकडं…ये सागऱ्या घास भरवते तुला, मेल्या थोबार कर इकडं…” मुक्ताचा हा भन्नाट उखाणा ऐकून मंचावर एकच हशा पिकतो.

हेही वाचा – शिवानी बावकर-आकाश नलावडेची ‘साधी माणसं’ १८ मार्चपासून ‘या’ वेळेत सुरू होणार, ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

दरम्यान, मुक्ता-सागरचं लग्न झाल्यापासून ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. सध्या सागरची बहीण स्वातीचं सत्य मुक्ता कोळी कुटुंबाला सांगेल का? याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejashri pradhan premachi goshta mukta taken ukhana for sagar video viral pps