मालिका आणि प्रेक्षकांच एक वेगळं नातं असतं. मालिकेचं कथानक, कलाकारांचा अभिनय उत्तम असला की, प्रेक्षक आवर्जुन न चुकता ती मालिका दररोज पाहतात. मग प्रेक्षकांना मालिकेतील पात्र हे आपल्या घरातील वाटू लागतं. त्यामुळे प्रेक्षकांना अधिक खिळवून ठेवण्यासाठी मालिकेचे निर्माते आणि लेखक प्रयत्न करत असतात. याचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर होत असतो. मागील आठवड्याची ऑनलाइन टीआरपीची यादी समोर आली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका नंबर वन ठरली आहे.

४ सप्टेंबरपासून सुरू झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका ही प्रेक्षकांच्या अल्पावधीत पसंतीस पडली. मालिकेतील मुक्ता, सागर, सईसह गोखले आणि कोळी कुटुंबातील इतर सदस्य घराघरात पोहोचले. मुक्ता-सागरची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक ठरली. त्यामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आली. सुरू होताना पहिल्याच आठवड्यात ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने ‘स्टार प्रवाह’च्या जुन्या मालिकांना मागे टाकून पहिलं स्थान मिळवलं. पण त्यानंतर मालिकेच्या टीआरपीमध्ये चढ-उतार पाहायला मिळाला. तरी देखील मालिका टॉप पाचमध्ये असायची. पण मागील आठवड्यातील ऑनलाइन टीआरपीच्या यादीत तेजश्रीच्या मालिकेने लोकप्रिय ‘ठरलं तर मग’ मालिकेला मागे टाकतं पहिलं स्थान पटकावलं आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका ऑनलाइन टीआरपीच्या यादीत पहिल्या स्थानावर आली आहे. ‘मराठी टेल बझ’ या इन्स्टाग्राम पेजवर मागील आठवड्याची ऑनलाइन टीआरपी यादी शेअर केली आहे.

A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…

हेही वाचा – Video: अरबाज खानच्या लग्नाच्या २ दिवसांनंतर एक्स गर्लफ्रेंड जॉर्जियाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “खूपच रडली…”

गेल्या काही आठवड्यापासून ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता-सागरचा लग्नसोहळा सुरू आहे. साखरपुडा, मेहंदी, संगीत, हळद, सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा होत आहे. यादरम्यान अनेक मालिकेत ट्विस्ट येत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचा मालिकेला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा परिणाम ऑनलाइन टीआरपीवर झाला आहे. मागील आठवड्याच्या ऑनलाइन टीआरपीमध्ये ‘प्रेमाची गोष्ट’ पहिल्या नंबर वन असून ४०.६ रेटिंग मिळाले आहे. तर ‘ठरलं तर मग’चा टीआरपी घसरला असून ४०.१ रेटिंग मिळाले आहे.

मागील आठवड्याच्या ऑनलाइन टीआरपीच्या यादीत टॉप १० मालिका

१) प्रेमाची गोष्ट
२) ठरलं तर मग
३) आई कुठे काय करते
४) सुख म्हणजे नक्की काय असतं
५) लक्ष्मीच्या पाऊलांनी
६) मन धागा धागा जोडते नवा
७) तुझेच मी गीत गात आहे
८) तुला शिकविन चांगलाच धडा
९) शुभविवाह
१०) मुरांबा

Story img Loader