तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. मुक्ता-सागरच्या लग्नामुळे मालिकेला एक वेगळं वळणं मिळालं आहे. सध्या तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना अशी परिस्थिती मुक्ता-सागरमध्ये पाहायला मिळत आहे. अशातच लवकरच मुक्ता सागरला एक शिक्षा देणार आहे.
काही दिवसांपूर्वी एका पार्टीमध्ये हर्षवर्धनने सई आपलीच मुलगी असल्याचं खोटं सागरला सांगितलं होतं. सागरला त्याच्यावर विश्वास बसला आणि तो मुक्ताला त्या पार्टीत एकटीला सोडून घरी निघून आला. त्यानंतर मुक्ताला हर्षवर्धन आणि सावनीने घरी सोडलं. मग मुक्ता घरी आली, तेव्हा सई सागरला मुक्ताविषयी विचारत होती. पण सागरच्या डोक्यात सतत हर्षवर्धनने सांगितलेलं खोटं येतं होतं. त्यामुळे तो रागाचा भरात सईला ढकलतो. पण तितक्यात मुक्ता येऊन सईला पडता-पडता वाचवते. त्यानंतर मुक्ता सागरला चांगलंच फटकारते. पुन्हा जर सईला अशी वागणूक दिली तर याद राखा, असं सागरला सुनावते. या घटनेनंतर मुक्ता सागरला एक अट घालते. दारू पिऊन सईला भेटायचं नाही, असं मुक्ता सागरला म्हणते. तरीही देखील पुन्हा सागर सईवर चिडताना दिसणार आहे. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.
हेही वाचा – Bigg Boss 17: अभिषेकच्या चेहऱ्यावर केलं वॅक्स तर मन्नाराच्या तोंडावर टाकली लाल मिरची पावडर, पाहा व्हिडीओ
या प्रोमोमध्ये, हर्षवर्धन सईला फोनवर विचारतो की, तू कोणासारखी दिसतेस गं? सई म्हणते, “माहित नाही.” मग हर्षवर्धन म्हणतो, “विचार की तुझ्या पप्पांना.” त्यामुळे सई सागरला विचारायला जाते. सई सागरला विचारते की, पप्पा मी कोणासारखी दिसते? बोलना. हे ऐकून सागर संतापतो आणि पुन्हा एकदा सईला ढकलतो. तितक्यात सागरचे बाबा सईला पडता-पडता वाचवतात. हे पाहून सगळ्यांच धक्का बसतो. शेवटी मुक्ता कोळी कुटुंबासमोर एक निर्णय घेते, तो म्हणजे सागरला शिक्षा देण्याचा.
मुक्ता म्हणते, “घरातल्या लहानांशी, मोठ्यांशी उद्धटपणे वागणाऱ्या माणसांचा मला तिटकारा आहे. असं वाटतं, असं वागणाऱ्या माणसाला एकदा तरी शिक्षा व्हावी.” मुक्ताच्या या निर्णयाला कोळी कुटुंब सहमती देतात का? आणि मुक्ता काय शिक्षा देते? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
हेही वाचा – Bigg Boss 17: अंकिता लोखंडेच्या समर्थनात उतरली सुशांत सिंह राजपूतची बहीण, म्हणाली, “अंकी तू…”
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. ‘ठरलं तर मग’नंतर मराठी मालिकाविश्वात दुसऱ्या क्रमांकावर असणारी मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.