अभिनेत्री तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मालिकेतील पात्र, कथानक प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. मुक्ता-सागरची तर जोडी हीट झाली आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं आहे. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीतही मालिका अव्वल स्थानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन टीआरपी रिपोर्टमध्ये ‘प्रेमाची गोष्ट’ पहिल्या स्थानावर आहे. तर मालिका सुरू झाल्यापासून टेलिव्हिजन टीआरपी रिपोर्टमध्ये तेजश्री व राजची मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. लवकरच मालिकेतील सावनीचा एक नवा डाव पाहायला मिळणार आहे.

kaumudi walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या पतीने शेअर केले लग्नातील फोटो; म्हणाला, “लग्नसंस्कारांकडे…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Premachi Goshta
Video : सईला मिळवण्यासाठी मुक्ताचं सावनीला खुलं आव्हान; म्हणाली, “पुढच्या ४ दिवसांत माझी मुलगी…”
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
Rapper Raftaar is all set to tie the knot with fashion stylist Manraj Jawanda
रफ्तार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार! घटस्फोटाच्या ५ वर्षांनी रॅपर चढणार बोहल्यावर, होणारी बायको कोण आहे? वाचा…
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
Aai Aani Baba Retire Hot Aahet
Video : भर लग्नमंडपातून स्वीटीचा भाऊ तिला घेऊन जाणार? पाहा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा नवा प्रोमो

हेही वाचा – शशांक केतकरने सध्याच्या राजकारणावर मांडलं परखड मत, शरद पवार व अमित शाहांचा उल्लेख करत म्हणाला…

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या पुढील भागात काय घडणार आहे? याचा व्हिडीओ ‘सीरियल जत्रा’ या पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सावनी स्वातीचा नवरा कार्तिकला हाताशी पकडून नवा डाव रचताना पाहायला मिळत आहे. सावनी कार्तिकला म्हणते, “मुक्ताला आधाराची गरज आहे. कारण तिचा नवरा एकदम युजलेस आहे. तिला असा आधार द्याना. हा आधारच तिचं लग्न मोडायचं कारण झालं पाहिजे.” त्यानंतर सावनीच्या सांगण्यावरून कार्तिक मुक्ता जवळ जाऊन तिच्यावर बळजबरी करताना दिसत आहे. आता सावनीच्या या नव्या डावाला मुक्ता-सागर कसे सामोर जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचा ओंकार राऊतसह ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले, “सलमान खानची बहीण…”

दरम्यान, लग्नानंतर काही दिवसांनी प्रेमात पडलेले मुक्ता-सागरमध्ये होळीच्या दिवशी फूट पडली. पुन्हा दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाले. पण त्यानंतर सागरने मुक्ताची माफी देखील मागितली. पण मुक्ताने सागरला काही माफ केलं नाही. आता यादरम्यान सावनीने कार्तिकची मदत घेऊन रचलेला नवा डाव किती यशस्वी ठरतो? हे पाहणं रंजक असणार आहे.

Story img Loader