मुक्ता-सागरच्या लग्नामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला एक नवं वळणं मिळालं आहे. लवकरच मुक्ता-सागरमधील प्रेम खुलताना पाहायला मिळणार आहे. पण त्यापूर्वी मालिकेत महत्त्वाचा निर्णय होणार आहे. सईची कस्टडी मुक्ताला मिळणार आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात सईच्या कस्टडीची सुनावणी पाहायला मिळाली. गेल्या सुनावणीदरम्यान जसं सईला विचारलं गेलं होतं, तुला कोणाबरोबर राहायला आवडेल. तसंच या सुनावणीच्या वेळी सईला विचारलं जातं. तेव्हा कोळी कुटुंबाला खात्री असते की, सई मुक्ताचं नाव घेणार. पण तसं होतं नाही. सई सावनीचं नाव घेते आणि यामुळे मुक्ता-सागरसह कोळी कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकते. सई असं का करते? हे कोणाच्या लक्षात येत नाही. पण यामुळे सावनी-हर्षवर्धनला खूप आनंद झालेला असतो. कारण हा हर्षवर्धनचा नवा डाव असतो. त्याने कोर्टाच्या सुनावणीपूर्वी सईला एक भीती घातली असते. ज्याप्रमाणे सावनी सागरला सोडून गेली तशीच मुक्ता देखील काही दिवसांत सागरला सोडून जाणार आहे. त्यामुळे जर मुक्ता कोळी कुटुंबात हवी असेल तर सावनीचं नाव घे, असं सईला हर्षवर्धनने सांगितलं असतं. पण हर्षवर्धनचा हा डाव त्याच्यावर उलटतो.
१५ मिनिटांच्या ब्रेकमध्ये न्यायाधीशांना हर्षवर्धनचा डाव समजतो. त्यामुळे न्यायाधीश सईची कस्टडी मुक्ताला देतात. न्यायाधीशांच्या या निर्णयामुळे मुक्ता-सागरसह कोळी, गोखले कुटुंबाला आनंद होतो. दोन्ही कुटुंब सईच्या स्वागताची जोरदार तयारी करतात. सागर स्वतःचा शब्द खरा ठरल्यामुळे खूप आनंदात असतो. हर्षवर्धन-सावनी स्वतः सईला घेऊन कोळी कुटुंबाकडे येतात. त्यावेळेस हर्षवर्धन मुक्ताचा अपमान करतो. तेव्हा सागर त्याला चांगल्याच शब्दात सुनावतो.
हर्षवर्धन सागरला म्हणतो की, कुठून आला रे तुला एवढा अटीट्यूड. या मुलीशी लग्न करून? हे ऐकताच सागर भडकतो आणि म्हणतो, “तोंड सांभाळून बोलायचं. बायको आहे ती माझी. मिसेस मुक्ता सागर कोळी. सागर कोळीची बायको आहे.” सागरच्या याच कृतीने तो मुक्ताचं मन जिंकतो.
हेही वाचा – मनोरंजन सृष्टीतून ब्रेक घेत न्यूझीलंडला जात लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने मिळवलं मोठं यश, म्हणाली…
दरम्यान, लवकरच मालिकेत हळूहळू मुक्ता-सागरची प्रेमाची गोष्ट सुरू होणार आहे. पण यादरम्यान हर्षवर्धन-सावनी कोणकोणते नवे डाव रचतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.