‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता-सागरचं नातं आता वेगळ्या वळणावर आलं आहे. सतत भांडणारे मुक्ता-सागर आता एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघं एकमेकांसाठी सरप्राइज देताना दिसत आहेत. लवकरच सागर देखील एक छान सरप्राइज मुक्ताला देणार आहे. हे सरप्राइज आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आजच्या भागात सागरने केलेल्या पुरणपोळ्या या उरतात. त्यामुळे मुक्ता त्या उरलेल्या पुरणपोळ्यांचे लाडू करते. तर दुसऱ्या बाजूला कोळी कुटुंबात आनंदाचं वातावरण असतं. कारण लकी एमबीए पास होतो. त्यामुळे सगळे आनंद साजरा करत असतात. तितक्यात मुक्ता-सागर घरी येतात. सगळ्यांना आनंद साजरा करताना पाहून सागर घरच्यांना विचारतो. तेव्हा सगळेजण लकी एमबीए पास झाल्याचं सांगतात. पण सागरचा त्यावर विश्वास बसत नाही. तसंच कोमलही म्हणते की, हा कॉपी करूनच पास झाला असेल. तेव्हा लकी मोबाइलमध्ये निकाल दाखवतो. ७५ टक्क्यांनी लकी पास झालेला असतो. यामुळे लकी सागरकडे बक्षीस स्वरुपात दीड लाख रुपये मागतो. तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो. पण लकीला ते पैसे फिरायला जाण्यासाठी हवे असतात. यावेळी मुक्ता सागरला पैसे द्यायला सांगते. तेव्हा सागर लकीला दीड लाख रुपये द्यायला तयार होतो.

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
premachi goshta new entry swarda thigale first reaction
सागर जुन्या मुक्ताला मिस करतोय का? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील रिप्लेसमेंटवर स्वरदा ठिगळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
Premachi Goshta actress Swarda Thigale react on troller
“रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकारांनी घेऊ नये…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील बदलावर युजरची प्रतिक्रिया; नवी मुक्ता म्हणाली, “आजही कलेचे…”

हेही वाचा – Video: नीता अंबानींनी लेक ईशासह केलेला सुंदर परफॉर्मन्स पाहिलात का? व्हिडीओ होतोय व्हायरल

यानंतर सागर मुक्ताला सरप्राइज देण्यासाठी एक प्लॅन करतो. तो घरच्यांना हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जायचं ठरवतो. म्हणून तो मुक्ताला लाल रंगाची साडी नेसायला लावतो. तसेच इतरांनाही तयार होण्यासाठी सांगतो. पण याव्यतिरिक्त सागरच्या डोक्यात वेगळं सुरू असतं. सगळे तयार झाल्यानंतर सागर पोटात दुखत असल्याचं नाटक करतो आणि घरच्यांना हॉटेलमध्ये जेवायला पाठवतो. तर मुक्ताला घरीच थांबवतो. मुक्ता सागरचं ऐकून घरी थांबते. त्यानंतर तो तिला पोटदुखीची गोळी आणायला मेडिकलमध्ये पाठवतो आणि सरप्राइज देण्यासाठी घर लाइट्स, लाल फुगे, मेणबत्त्यांनी सजवतो. हे सरप्राइज पाहून मुक्ताला आश्चर्याचा धक्काच बसतो. तिला काही समजतं नाही. तितक्यात सागर हातात गुलाब घेऊन येतो आणि मग मुक्ताला प्रपोज करतो. मुक्ता सागरचं हे प्रपोज स्वीकारते.

या सर्व नाट्यानंतर मुक्ता-सागरचा रोमान्स पाहायला मिळणार आहे. ‘तू ही रे माझा मितवा’ या गाण्यावर मुक्ता-सागर रोमान्स करताना दिसणार आहेत. हा रोमान्स सुरू असतानाच तितक्यात कोळी कुटुंब घरी येतात आणि मग काय घडतं? हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे.

हेही वाचा – Video: ‘रमा राघव’ फेम अभिनेत्री झळकणार ‘झी मराठी’च्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या नव्या मालिकेत, पाहा प्रोमो

दरम्यान, तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून मालिकेतील पात्र आता घराघरात पोहोचले आहेत. मुक्ता, सागर, सई, सावनी, हर्षवर्धन, इंद्रा कोळी, जयंत कोळी, माधवी, पुरू भाऊ अशा मालिकेतील सर्व पात्रांना प्रेक्षकांनी आपलंस केलं आहे. त्यामुळेच मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या यादीतही अव्वल स्थानावर आहे.

Story img Loader