‘स्टार प्रवाह’वरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला मुक्ता-सागरच्या लग्नामुळे रंजक वळणं मिळालं आहे. लग्नानंतरची सुरुवात दोघांमधील वादाने झाली असली तरी पुढे त्यांच्यामध्ये कसं प्रेम निर्माण होतं हे पाहायला मिळणार आहे. पण त्यापूर्वी कोर्टात सईच्या कस्टडीचा मोठं नाट्य पाहायला मिळणार आहे. सई जरी सावनीची निवड करत असली तरी अखेर ती मुक्ता-सागरचीचं होणार आहे. हे कसं काय? नेमकं कोर्टात काय घडणार? हे जाणून घ्या…

मुक्ता-सागरच्या हनिमूननंतर दुसऱ्याच दिवशी सईच्या कस्टडीची सुनावणी होणार आहे. मुक्ताबरोबर सागरचं लग्न झाल्यामुळे सई आपल्याकडेच येणार, असं कोळी कुटुंबाला वाटत असतं. पण कोर्टात एक वेगळं नाट्य पाहायला मिळणार आहे. सुनावणीच्या सुरुवातीला मुक्ता-सागरचं लग्न झाल्यामुळे सावनीला मोठा धक्का बसतो. पण त्यानंतर सई कोळी कुटुंबाला मोठा धक्का बसेल असणार निर्णय घेते. गेल्या सुनावणीदरम्यान जसं सईला विचारलं गेलं होतं, तुला कोणाबरोबर राहायला आवडेल. तसंच या सुनावणीच्या वेळी सईला विचारलं जातं. तेव्हा कोळी कुटुंबाला खात्री असते की, सई मुक्ताचं नाव घेणार. पण तसं होतं नाही. सई सावनीचं नाव घेते आणि यामुळे मुक्ता-सागरसह कोळी कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकते. सई असं का करते? हे कोणाच्या लक्षात येत नाही. पण यामुळे सावनी-हर्षवर्धनला खूप आनंद झालेला असतो. कारण हा हर्षवर्धनचा नवा डाव असतो.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल

हेही वाचा – Video: ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर रुपाली भोसलेचा वाढदिवस ‘असा’ केला साजरा, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

मुक्ता-सागरने लग्न केलंय हे हर्षवर्धनला माहित असतं. त्यामुळे तो कोर्टाच्या सुनावणीपूर्वी सईला एक भीती घालतो. हर्षवर्धन सईला म्हणतो, “तू जन्माला आल्यानंतर तुझी सावनी आई सहा महिन्यातच तुला सोडून गेली. पण आताही तुझ्याबाबतीत असंच घडणार आहे. काही दिवसात तुझी मुक्ता आई तुला कायमची सोडून जाणार आहे. त्यामुळे तुला जर मुक्ता आई त्या घरात राहायला हवी असेल तर तुला सावनी आईचं नाव घ्यावं लागणार. नाहीतर मुक्ता आई तुला सोडून जाईल.” हर्षवर्धनच्या याच भीतीने सई कोर्टात तिचा निर्णय बदलते आणि सावनीचं नाव घेते. पण यामुळे मुक्तासह कोळी कुटुंबाला धक्का बसतो. सईने निर्णय का बदलला? तिच्यावर कोणी दबाव आणला का? असे अनेक प्रश्न मुक्ता-सागरला पडतात. मात्र सईच्या निर्णयानंतर जज १५ मिनिटांचा ब्रेक देतात आणि याच १५ मिनिटांच्या ब्रेकमुळे हर्षवर्धनाचा डाव त्याच्यावरच उलटतो.

१५ मिनिटांच्या ब्रेकनंतर कोर्टाची सुनावणी सुरू होते. यावेळी जज म्हणतात, “सगळ्या पुराव्यांची नीट पडताळणी केल्यानंतर कोर्टाने असा निर्णय घेतलाय, सई सागर कोळी ही यापुढे तिच्या आईबरोबर राहिल. मी अजून स्पष्ट करून सांगतो, यापुढे सई सागर कोळी ती तिची आई मुक्ता सागर कोळीबरोबर राहिल.” या निर्णयामुळे चिंतेत असलेल्या मुक्तासह कोळी कुटुंबाला सुखद धक्काच बसतो. सगळे आनंदी होतात. पण हर्षवर्धन-सावनी मोठा धक्काच बसतो. या निर्णयानंतर सई मुक्ता आई म्हणतं मुक्ताला घट्ट मिठी मारते.

हेही वाचा – Video: “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं…”, म्हणत प्रसाद ओकने नवीन वर्षी दाखवली नव्या घराची झलक

पण जज असा निर्णय काय घेतात? हा प्रश्न पडलाच असेल. तर १५ मिनिटांच्या ब्रेकदरम्यान जज सईला भेटतात. त्यावेळी हर्षवर्धनने सईला घातलेली भीती ती जजना सांगते. त्यामुळे जज सईची कस्टडी मुक्ताला देतात. यामुळे हर्षवर्धनचा खरा चेहरा संपूर्ण कोर्टासमोर येतो.

आता सईचं कोळी कुटुंबात जोरदार स्वागत होणार आहे. या स्वागताची तयारी खास मुक्ता करताना पाहायला मिळणार आहे. कोळी कुटुंबाच्या आनंदात गोखले कुटुंब देखील सहभागी होणार आहे.

Story img Loader