दर आठवड्याला मालिकांचे टीआरपी रिपोर्ट येतात. यामध्येही दोन प्रकारचे रिपोर्ट असतात एक म्हणजे ऑनलाइन टीआरपी रिपोर्ट आणि दुसरा टेलिव्हिजन टीआरपी रिपोर्ट. आता मागील आठवड्याचा टेलिव्हिजन टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. ज्यात कला-अद्वैतची जोडी मुक्ता सागरपेक्षा वरचढ झालेली पाहायला मिळत आहे.

‘मराठी टीआरपी तडका’ या इन्स्टाग्राम पेजवर टेलिव्हिजन टीआरपी रिपोर्ट शेअर करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा टीआरपी घसरलेला पाहायला मिळत आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून टीआरपी रिपोर्टमध्ये दुसऱ्या स्थानावर होती. पण मागील आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टमध्ये ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका तिसऱ्या स्थानावर पाहायला मिळत आहे. दुसऱ्या स्थानावर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका आहे. तसंच टीआरपीच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’चं अधिराज्य कायम आहे. नेहमीप्रमाणे ही मालिका पहिल्या स्थानावर आहे.

हेही वाचा – म्हातारी म्हणणाऱ्यांना अन् दातावरून हिणवणाऱ्यांना जुईली जोगळेकरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “स्वतःची अक्कल…”

मागील आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टनुसार, ‘ठरलं तर मग’ मालिकेचं रेटिंग ६.९ आहे. तर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचं रेटिंग ६.५ आहे. तसंच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचं रेटिंग ६.४ आहे. पहिल्या १० मध्ये ‘स्टार प्रवाह’च्या मालिका आहेत.

हेही वाचा – Video: अजय-अतुलच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये थिरकल्या नीता अंबानी, ‘झिंगाट’वर केला डान्स, पाहा व्हिडीओ

टॉप-१० मालिका

१) ठरलं तर मग
२) लक्ष्मीच्या पाऊलांनी
३) प्रेमाची गोष्ट
४) तुझेच मी गीत गात आहे
५) घरोघरी मातीच्या चुली
६) सुख म्हणजे नक्की काय असतं
७) साधी माणसं
८) मन धागा धागा जोडते नवा
९) तुझे मी गीत गात आहे – महाएपिसोड
१०) अबोली

Story img Loader