‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. कारण मुक्ता-सागरचा लग्नसोहळा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मुक्ता-सागरचा थाटामाटात साखरपुडा पार पडला. आता लवकरच मेहंदी, संगीत, हळद, सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. मुक्ता-सागरच्या लग्नसोहळ्यादरम्यान अनेक रंजक गोष्टी घडणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कालच्या भागात मुक्ता-सागरच्या मेहंदी सोहळ्याला सुरुवात होताना पाहायला मिळाली. यासाठी मुक्ताने खास सईला बोलवून घेतलं असतं. त्यामुळे सावनी सईला मुक्ताकडे सोडायला जाते. पण तेव्हाच तिला व हर्षवर्धनला मुक्ता-सागर एकत्र बोलताना दिसतात. मात्र त्यांना हे कळतं नाही की, मुक्ता-सागर लग्न करणार आहेत. त्यामुळे सावनी फक्त मुक्ताकडे सागरची चौकशी करून सईला सोडून जाते. त्यानंतर सईला मुक्ता अँटीचं सागर पप्पाशी लग्न होणार हे कळतं. त्यामुळे ती मुक्ताला आई म्हणून हाक मारताना दिसते. हे ऐकून मुक्तासह तिची आई, बहीण भावुक होतात अन् त्यानंतर मेहंदी समारंभ सुरू होतो.

हेही वाचा – Video: ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेचा ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग, अभिनेत्री व्हिडीओ करत म्हणाली, “अखेर…”

आता लवकरच सई मुक्ताला एक खास सरप्राइज देताना दिसणार आहे. हे सरप्राइज सईने स्वतःच्या हाताने तयार केलं आहे. ते म्हणजे सर्वोत्कृष्ट आईची ट्रॉफी. हा, सई मुक्ताला सर्वोत्कृष्ट आईची ट्रॉफी देताना दिसणार आहे. हे पाहून मुक्ता पुन्हा भावुक झाल्याचं पाहायला मिळत. मुक्ता-सागरच्या मेहंदीनंतर संगीताचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी खास स्टार प्रवाहच्या परिवारातील सदस्याची उपस्थिती असणार आहे.

मुक्ता-सागर संगीत सोहळ्याला ‘पिंकीचा विजय असो’मधील पिंकी-युवराज, ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील आनंदी-सार्थक, ‘अबोली’मधील अबोली, तर ‘लग्नाची बेडी’मधील मधुराणी असे स्टार प्रवाहच्या परिवारातील सदस्य हजर राहणार आहेत. तसेच यांचा खास डान्सही पाहायला मिळणार आहे. याचा व्हिडीओ ‘सीरियल जत्रा’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – श्रेयस तळपदेच्या पत्नीने पोस्ट करून अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाली…

दरम्यान, मुक्ता-सागरचा आतापर्यंतचा लग्नसोहळा निर्विघ्नपणे पार पडताना दिसत आहे. पण जेव्हा सावनीला कळेल की मुक्ता सागरशी लग्न करतेय, तेव्हा ती काय नवा डाव रचते? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejashri pradhan premachi goshta upcoming episode mukta sagar sangeet ceremony pps