मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. आतापर्यंत नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. तर भूमिकेसाठी ती लखोंमध्ये मानधनही आकारते. तर तिला मिळालेल्या पहिल्या मानधनातून तिने काय खरेदी केलं होतं हे तिने आता सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या तेजश्री प्रधानचं शिक्षण किती ते माहीत आहे का? घ्या जाणून…

तेजश्रीची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतून तेजश्रीने दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. तिची मालिका आणि तिची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली असून सोशल मीडियावरून त्याला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. अशातच आता तेजश्रीने तिच्या आयुष्यातील काही पहिल्या गोष्टी सांगितल्या.

हेही वाचा : तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेबद्दल तिच्या आई-वडिलांनी दिली प्रतिक्रिया, लेकीचं काम पाहून म्हणाले…

तेजश्रीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आयुष्यातील अनेक पहिले अनुभव सांगितले. तर यावेळी तिने तिला मिळालेल्या पहिल्या मानधनातून तिने स्वतःसाठी काय खरेदी केलं होतं याचाही खुलासा केला. ती म्हणाली, “पहिल्यांदा मला कामाचे पैसे मिळाल्यावर मी स्वतःला टी-शर्ट घेतला होता.” आता तेजश्रीचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejashri pradhan reveals what she did purchase from her first payment rnv