Tejashri Pradhan : बदलापूरमधील आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणामुळे अजूनही महाराष्ट्रात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. या प्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. २० ऑगस्टला बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरून याप्रकरणी आंदोलन केलं. संतप्त नागरिक शाळेची तोडफोड करताना पाहायला मिळाले. रेलरोको आंदोलन केलं. चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केलेल्या नराधमाला फासावर लटकवा असा एकच सूर नागरिकांनी लावून धरला होता. बदलापूर प्रकरण ताजे असतानाच आता अंबरनाथमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अंबरनाथमधील ३५ वर्षीय नराधमाने ९ वर्षांच्या मुलीचा शौचायलात विनयभंग केल्याचं उघडकीस आलं आहे. मुलीच्या शेजारी राहणाऱ्या या नराधमाने मुलीला शौचालयात नेऊन तिला अश्लील चित्रफित दाखवत तिच्यावर विनयभंग केला. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. संतोष कांबळे असं आरोपीचं नाव आहे. या नराधमाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अभिनेत्री तेजश्री प्रधानने ( Tejashri Pradhan ) संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Parli Sarpanch accident shiv sena ubt group
Beed Crime: ‘बीड जिल्हा केंद्रशासित प्रदेश करा’, सरपंचाच्या अपघातानंतर ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”

हेही वाचा – “सुरज चव्हाणने सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकलं नाही पाहिजे”, मराठी अभिनेत्याचं वक्तव्य, म्हणाला…

अभिनेत्री तेजश्री प्रधानने ( Tejashri Pradhan ) सोशल मीडियावर अंबरनाथ प्रकरणी भाष्य केलं आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं आहे, “अजून किती वेळानंतर या नराधमांना शिक्षा मिळणार…समाजात भीती पेरायची वेळ आली आता..जागे व्हा…”

हेही वाचा – Video: ‘पारू’ मालिकेत नात्यांचा नवा अध्याय सुरू होणार, प्रितमची प्रेयसी प्रियाचं सत्य समोर येणार

Tejashri Pradhan Post

हेही वाचा – Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा बहिणींबरोबर दाक्षिणात्य लोकगीतावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतो व्हायरल

दरम्यान, बदलापूर प्रकरणावरही मराठी कलाकारांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे याप्रकरणावर परखड मतं मांडली. अभिनेत्री तेजस्विनी पंडित, प्रसाद ओक, शिवाली परब, सोनाली कुलकर्णी, अक्षय केळकर, मृण्मयी देशपांडे, प्रिया बापट, अभिजी केळकर, नेहा शितोळे, सुरभी भावे अशा अनेक मराठी कलाकारांनी बदलापूर प्रकरणावर भावना व्यक्त केल्या. अभिनेत्री सुरभी भावेने लिहिलं की, बदलापूरमध्ये साडे तीन वर्षांच्या दोन मुलींवर त्यांच्या शाळेत लैंगिक अत्याचार!…एका मुलीची आई म्हणून दररोज जीव टांगणीला लागेल असा प्रसंग…माणुसकीचा अंत होत आहे हे निश्चित…त्या पालकांवर काय प्रसंग ओढवला असे याची कल्पना सुद्धा करवत नाहीये…कधी अशा आरोपींना थेट मृत्यू शिक्षा होईल देव जाणे.

Story img Loader