अभिनेत्री तेजश्री प्रधानने आपल्या सहजसुंदर अभिनयाने मराठी सिनेसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे तेजश्रीचा मोठा चाहता वर्ग आहे. पण काही दिवसांपूर्वी तेजश्रीने चाहत्यांना धक्का बसणारा निर्णय घेतला. लोकप्रियतेच्या शिखरावर असणारी मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मधून तिने एक्झिट घेतली. ही बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले. “तू प्रेमाची गोष्ट सोडू नको”, “तू असं का करत आहेस?”, “तुझ्यामुळेच आम्ही ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका पाहत होतो”, “तुझ्याशिवाय ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला मज्जा नाही”, अशा प्रतिक्रियांचा पाऊस सोशल मीडियावर पडला. अजूनही याबाबत चर्चा सुरू आहे. अचानक तेजश्रीने मालिका का सोडली? यामागचं नेमकं कारण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. पण, मालिका सोडल्यानंतर तेजश्री सध्या काय करते? हे तुम्हाला माहितीये का?

अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्याचं स्वतः जाहीर केलं नव्हतं. पण मालिका सोडल्याची बातमी येताच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली; ज्यामुळे तिने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला रामराम केल्याचं निश्चित झालं. “चिअर्स…काही वेळेला बाहेर पडणं गरजेचं असतं. तुमची कुवत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा. कारण हे तुमच्यासाठी कोणीही करणार नाही,” असं तेजश्रीने पोस्टमध्ये लिहिलं होतं. तिची ही पोस्ट खूप व्हायरल झाली होती. त्यानंतर नुकत्याच तिने इन्स्टाग्रामवर दोन स्टोरी शेअर केल्या आहेत. ज्यामधून ती सध्या काय करते? हे समोर आलं आहे.

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील इंद्राचा लेकीबरोबर आशा भोसलेंच्या ‘या’ लोकप्रिय गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

तेजश्री प्रधानने प्राजक्ता माळीच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. प्राजक्ता माळीचे गुरु श्री श्री रविशंकर आहेत, जे आता सर्वश्रुत आहे. याच श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात तेजश्री सध्या वास्तव्यास आहे. याच आश्रमातील जेवणाच्या ताटाचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या जेवणाच्या ताटात वरण-भात, पापड, भाजी, असे काही पदार्थ पाहायला मिळत आहे.

तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम स्टोरी
तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा – “कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळून…”, विशाखा सुभेदारची पतीसाठी खास पोस्ट; म्हणाली, “तू दाही दिशांना…”

त्यानंतर तेजश्रीने वासराबरोबर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री वासरला हात लावताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तेजश्रीने लिहिलं की, आम्ही एकमेकांसारखे चेहरे केलेत की नाही…आणि यांच्या डोळ्याचं काय करायचं…किती तो निरागसपणा.

तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम स्टोरी
तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा – “कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळून…”, विशाखा सुभेदारची पतीसाठी खास पोस्ट; म्हणाली, “तू दाही दिशांना…”

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानची जागा अभिनेत्री स्वरदा ठिगळेने घेतली आहे. स्वरदाने मराठीसह हिंदी मालिकेत काम केलं आहे. ‘माझे मन तुझे झाले’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमधून ती घराघरात पोहोचली आहे.

Story img Loader