गेल्या काही दिवसांपासून मालिकाविश्वात अनेक बदल होत आहेत. काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. तर मालिकांच्या वेळा बदल आहेत. तसेच आता नवनवीन मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. सध्या तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षक वर्गामध्ये या मालिकेविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे. नुकतंच मालिकेच शीर्षकगीत सुद्धा प्रदर्शित करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Video: “समोरचा मेला तरी कोणी…”, शरद पोंक्षेंचं वक्तव्य चर्चेत; चाळ संस्कृतीविषयी केलं भाष्य

‘जरा खुलेलं ही…जरा फुलेलं ही…तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट’ अशा सुंदर ओळी असलेलं या मालिकेचं संपूर्ण शीर्षकगीत प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडिया पेजवर शीर्षकगीताचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. श्रीपाद जोशी हे शीर्षकगीताचे गीतकार असून निलेश मोहरीर यांनी हे संगीतबद्धक केलं आहे. तसेच अभिषेक तेलंग आणि सुगंधा दाते यांच्या मंत्रमुग्ध आवाजात हे शीर्षकगीत गायलं गेलं आहे. या दोघांचं ‘सारेगमप’शी एक खास नातं आहे. ते काय आहे जाणून घ्या.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीची सर्वात आवडती गोष्ट माहितेय? जाणून घ्या

हेही वाचा – अपूर्वा नेमळेकरला अजूनही येत आहे शेवंताची आठवण; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “या भूमिकेशी…”

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेच शीर्षक गीत गायलेला गायक अभिषेक तेलंग हा मराठी सारेगमपचा फायलिस्ट होता. तर गायिका सुगंधा दाते ही हिंदी ‘सारेगामापा लिटिल चँप्स २०१९’ची विजेती आहे.

हेही वाचा – शुभांगी गोखले लेक आणि जावयासह पोहोचल्या खास मैत्रिणीच्या घरी; फोटो शेअर करत सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, “तुम्हाला सोडणारच…”

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ४ सप्टेंबरपासून संध्याकाळी ८ वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे व्यतिरिक्त शुभांगी गोखले, अपूर्वा नेमळेकर असे बरेच कलाकार पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejashri pradhan upcoming marathi serial premachi goshta title song released pps
Show comments