अभिनेता सिद्धार्थ जाधव होस्ट करत असलेला ‘आता होऊ दे धिंगाणा २’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये दोन टीममधील अनोखी सांगीतिक लढत पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात. कोणती टीम बाजी मारते?, कोण घंटा घरातून किती रक्कम आणतंय? हे पाहणं उत्कंठावर्धक असतं.

गेल्या आठवड्यात ‘आई कुठे काय करते’ मालिका विरुद्ध ‘प्रव्हेंजर्स रिटर्न्स’ यांच्यात सांगीतिक लढत झाली. यामध्ये ‘आई कुठे काय करते’ टीम चारही फेऱ्या हरले. यामुळे चार वेळा ‘प्रव्हेंजर्स रिटर्न्स’ यांना घंटा घरात जाण्याची संधी मिळाली. त्यांनी एकूण ६० हजार १०३ रुपये आणून गेल्या आठवड्याचे विजेते ‘प्रव्हेंजर्स रिटर्न्स’ ठरले. याआधीही प्रव्हेंजर्स आले होते त्यांनी ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीमला हरवलं होतं. आता या आठवड्यात ही सांगीतिक लढत खेळण्यासाठी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील कलाकार हजर होणार आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Wife murders husband with help of lover in dapoli crime news
प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले; रत्नागिरी जिल्हात खळबळ
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
premachi goshta tejashree pradhan exit and swarda thigale enters in the show
तेजश्री प्रधानची Exit, स्वरदाची एन्ट्री! ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये ‘या’ दिवशी येणार नवीन मुक्ता, सईबरोबरचा भावनिक प्रोमो आला समोर

हेही वाचा – Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’मधून ‘हा’ सदस्य झाला बघेर, नाव ऐकताच प्रेक्षकांना झाला आनंद

तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. प्रेक्षकांचा या मालिकेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा २’मध्ये या मालिकेच्या टीमला टक्कर द्याला ‘आमने सामने’ नाटकातील कलाकार आणि ‘आईच्या गावात मराठीत बोल’ चित्रपटातील कलाकार येणार आहेत. या आठवड्यात ही सांगीतिक लढत पाहायला मिळणार आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये कलाकारांची धमाल, मस्ती सर्व काही पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: भर हायवेवर उतरुन ‘या’ मराठी अभिनेत्याने वाचवला मुक्या प्राण्याचा जीव, प्रसंग सांगत म्हणाला…

दरम्यान, ‘आता होऊ दे धिंगाणा २’मधील या आठवड्यातील सांगीतिक लढत कोण जिंकतंय?, कोण घंटा घरातून किती रक्कम आणतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader