तेजस्वी प्रकाश तिच्या दिलखुलास स्वभावामुळे नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. गेले अनेक महिने ती करण कुंद्राला डेट करत आहे. तिच्या आणि करणच्या नात्यामुळेही ती नेहमी चर्चेत असते. तेजस्वी प्रकाश आणि तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा अनेकदा एकत्र दिसले आहेत. पण आता एक व्हिडीओ शेअर करत तेजस्विनीने ब्रेकअप करत असल्याचं सांगितलं आहे.
तेजस्वी आणि करण अनेकदा एकमेकांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. अनेक फोटोंमध्ये ती दोघं रोमान्स करतानाही दिसली आहेत. पण आता अलीकडेच तिचा स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
आणखी वाचा : Video: ड्रेसचा पट्टा घसरला अन्…अनन्या पांडेची भर कार्यक्रमात फजिती
या व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिताना तेजस्वीने ब्रेकअपचा उल्लेख केला आहे. पण करणशी नाही तर ती तिच्या चेहऱ्यावरील पिंपल्सशी ब्रेकअप करणार आहे. नुकतीच तिने एका ब्रॅंडची जाहिरात शूट केली. तिच जाहिरात तिने सोशल मिडियावरून पोस्ट केली आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये तेजस्वीने तिच्या स्किनकेअर रूटीनबद्दल बोलली. पण तेजस्वी करणशी नाही तर तिच्या पिंपल्सशी ब्रेकअप करण्याबद्दल बोलली आहे हे कळल्यावर तिचे चाहते सुखावले आहेत.
हेही वाचा : Photos – करण कुंद्राने तेजस्वी प्रकाश आणि कुटुंबियांसह साजरा केला ३८ वा वाढदिवस, पाहा खास फोटो
करण आणि तेजस्वीची जोडी त्यांच्या चाहत्यांना फर आवडते. ते एकमेकांच्या प्रत्येक सुख-दुःखात सामील असतात. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांना एकत्र पाहण्याची अनेकांना इच्छा आहे. आता त्या व्हिडीओवर कमेंट करत “पिंपल्सशी केलास ते चांगलं केलंस, पण करण आणि तू ब्रेकअप करू नका” असं तिचे चाहते तिला सांगत आहेत.