‘येरे येरे पैसा’, ‘अगं बाई अरेच्छा’, ‘तू ही रे’ अशा अनेक चित्रपटांमुळे अभिनेत्री तेजस्विनी पंडित घराघरांत लोकप्रिय झाली. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अनेकदा ती सामाजिक आणि राजकीय विषयांवर परखडपणे आपलं मत मांडताना दिसते. तेजस्विनीने नवरात्र उत्सवानिमित्त अलीकडेच ‘लोकमत फिल्मी’च्या मुलाखतीला हजेरी लावली होती. या वेळी तिने तिची आई ज्योती चांदेकरांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर या तेजस्विनी पंडितच्या आई आहेत. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत आहेत.

हेही वाचा : ‘कॉफी विथ करण’च्या पहिल्याच भागात का भावुक झाला करण जोहर? रणवीर-दीपिकासमोर व्यक्त केली खंत

pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Leopard Mother Sacrifices Herself To Protect Her Cubs shocking video
VIDEO: “विषय काळजाचा होता” पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवटी आईचं प्रेम जिंकलं की सिंहाची ताकद?
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत

अभिनेत्री तिच्या आईविषयी सांगताना म्हणाली, “माझी आई आता ६८ वर्षांची आहे आणि या वयात ती भरपूर शूटिंग करते याचं मला खरंच खूप कौतुक आहे. तिचा सेटवर शूटिंगला जातानाचा उत्साह माझ्यासाठी अत्यंत लाघवी आणि कमाल असतो. या वयात एवढ्या पॅशेनेटली काम करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे.”

हेही वाचा : ‘बॉईज ४’ चित्रपटाबद्दल काय आहे प्रिया बेर्डेंची प्रतिक्रिया? लेक अभिनय बेर्डेच्या कामाबद्दल म्हणाल्या, “त्याची भूमिका…”

तेजश्री पुढे म्हणाली, “तिची दुखणी-खुपणी खूप आहेत. तिचं स्पाइनचं ऑपरेशन झालंय, लवकरच गुडघ्यांचं ऑपरेशन होईल तिला भरपूर आरोग्यदायी समस्यांचा सामना करावा लागतो. अलीकडेच ती ‘ठरलं तर मग’च्या सेटवर चक्कर येऊन पडली होती. एवढं होऊनही ती दुसऱ्या दिवशी शूटिंगला गेली.”

हेही वाचा : Raveena Tandon: रवीना टंडन: अभिनेत्री, फोटोग्राफर आणि दत्तक मुलींची आई

“आईच्या कलेमध्ये ही जी कोणती ताकद आहे ती मला प्रचंड ऊर्जा देते. या क्षेत्रात येण्यापूर्वी मी कधीच तिच्या नावाचा वापर केला नाही. मला तुझी शिडी करायची नाही असं मी तिला सांगितलं होतं. मला ज्योती चांदेकरांची मुलगी ही ओळख नको होती. आई तिच्या माहेरच्या आडनावाने म्हणजेच चांदेकर नावाने प्रसिद्ध असल्याने ते माझ्यासाठी फायद्याचं ठरलं. मी कधीच माझी ओळख ज्योती चांदेकरांची मुलगी अशी सांगत नाही. मी यशस्वी झाले तर ते माझं यश असेल आणि अयशस्वी ठरले तरी जबाबदारी माझी असेल हे मी आईला आधीच सांगितलं होतं.” असं तेजस्विनीने सांगितलं.