‘अगले जन्म मोहे बिटिया ही कीजो’ व ‘राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी’ या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रतन राजपूत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव सांगितला होता. त्यानंतर अभिनेत्रीने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमधून दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील धक्कादायक अनुभव सांगितला आहे. जर तिने तडजोड करण्यासाठी होकार दिला असता तर ती आज दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेला चेहरा असती, असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.

‘पिंकविला’ या वृत्तसंस्थेशी बोलताना रतन राजपूत म्हणाली की, “जेव्हा मी ‘अगले जन्म मोहे बिटिया ही कीजो’ मालिका करत होती, तेव्हा मला दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधून खूप फोन आले होते. त्यामध्ये काही चांगल्या दिग्दर्शकांचेही फोन होते; परंतु ते सांगायचे की, ‘रतन तुम्हाला थोडं वजन वाढवायला लागले. तुम्ही खूप बारीक आहात. अभिनेत्याने या मागणीवर होकार दिला आहे, पण हे झालं नाही तर तुम्हाला तडजोड करावी लागेल.”

when mamta kulkarni had fight with ameesha patel
“स्टार कोण? तू की मी?” ममता कुलकर्णीने भर पार्टीत केलेली शिवीगाळ, मध्यस्थी करणाऱ्या ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीला…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
elizabeth ekadashi fame sayali bhandakavathekar talk about why didn't choose acting field
‘एलिझाबेथ एकादशी’ फेम झेंडूने पुढे अभिनय क्षेत्र का निवडलं नाही? सायली भांडाकवठेकर म्हणाली, “हे भयानक…”
man dhaga dhaga jodte nava fame actor abhishek rahalkar engagement
‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; ‘दुर्गा’ फेम अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत
riya sen ashmit patel leaked MMS controversy
दिग्गज अभिनेत्रीची नात, एका गाण्याने बनली स्टार; सलग १२ फ्लॉप चित्रपट, MMS लीक झाला अन्…
actor suvrat joshi play role in vicky kaushal chhaava movie
‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेता ‘छावा’मध्ये झळकणार! विकी कौशलबद्दल म्हणाला, “सेटवर प्रचंड मेहनत…”

हेही वाचा – ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रणबीर व ऋषी कपूर यांच्यात सतत व्हायचे वाद, जाणून घ्या कारण

“एक व्यक्ती मला फोन करून बोलला की, ‘तुम्हाला या इंडस्ट्रीमधले नियम माहीत असतीलच.’ याबाबत मी त्यांना पुन्हा विचारलं. त्यावर ती व्यक्ती म्हणाली की, ‘तुम्हाला माहीत असेल की, इंडस्ट्रीमध्ये दिग्दर्शक, निर्माता, प्रमुख अभिनेता आणि कदाचित डीओपीबरोबर…’ यानंतर मी त्याला थेट विचारलं. तेव्हा तो म्हणाला की, ‘इथे तुम्हाला तडजोड करावी लागते.’ हे ऐकताच मी त्या प्रोजेक्टला नकार दिला. त्यानंतर आजपर्यंत मला दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधून एकही फोन आला नाही, ज्यावर तडजोड करण्याविषयी बोललं गेलं नाही.”

हेही वाचा – “काश्मिरी पंडितांचं नेमकं सत्य काय होतं?” विवेक अग्निहोत्री घेऊ येतायत ‘द कश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड’; पाहा ट्रेलर

हेही वाचा – आता मोठ्या पडद्यावर बिग बी साकारणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका? चित्रपटाची कहाणी काय असणार जाणून घ्या

पुढे अभिनेत्री रतन म्हणाली की, “हे फक्त बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये असतं असं लोकांना वाटतं, पण हे दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्येही असतं. पण संस्कृती, रितीरिवाज, कपडे आणि प्रत्येक गोष्टींचा सन्मान राखून चित्रपट केले जात असल्यामुळे दाक्षिणात्य इंडस्ट्री चांगली काम करताना दिसत आहे.”

Story img Loader