अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं निधन झालंय. त्याने आज (११ नोव्हेंबर) वयाच्या ४६ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. तो गेल्या काही वर्षांपासून टीव्ही मालिकांमध्ये काम करत होता. ‘कुसुम’, ‘वारिस’ आणि ‘सूर्यपुत्र कर्ण’ अशा मालिकांमुळे त्याला लोकप्रियता मिळाली होती. जिममध्ये व्यायाम करताना त्याचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या जाण्याने टेलिव्हिजन विश्वामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्यामागे त्याची पत्नी अलेसिया आणि दोन मुलं असा परिवार आहे.
जय भानुशालीने सोशल मीडियावर सिद्धांतचा फोटो शेअर करत चाहत्यांना त्याच्या निधनाची बातमी दिली. या फोटोवर त्याने तू खूप लवकर गेलास असे लिहिले आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना जयने ही माहिती त्याच्या या जवळच्या मित्राकडून कळली असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्याने सिद्धांतचा मृत्यू जिममध्ये व्यायाम करतानाचा झाला आहे या बातमीची पृष्टी केली.
आणखी वाचा – ‘हेरी फेरी ३’ मध्ये झळकणार बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता; परेश रावल यांनी दिली माहिती
सिद्धांतने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्याला काहीजण आनंद म्हणूनही ओळखतात. त्याने कुसुम या हिंदी मालिकेमध्ये काम करुन अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. तो मालिका विश्वामध्ये फार प्रसिद्ध होता. कसौटी जिंदगी की, कृष्णा अर्जुन, क्या दिल में है अशा मालिकांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. तो क्यू रिश्तों में है कटी बट्टी आणि जिद्दी दिल या मालिकांमध्येही झळकला होता.
आणखी वाचा – जितेंद्र जोशीने केला ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश; सदस्यांना टास्क देत म्हणाला, “तो मार…”
त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव इरा असे आहे. २००० मध्ये त्यांचा विवाह झाला होता. पुढे त्यांनी २०१५ मध्ये घटस्फोट घेतला. त्यांना एक मुलगी आहे. सिद्धांतने २०१७ मध्ये सुपरमॉडेल अलेसिया राऊतशी लग्न केले.