छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टीआरपीसाठी नेहमीच चढाओढ सुरू असते. मालिकेचा टीआरपी थोडा जरी घसरला, तरी निर्माते लगेच नवनवे ट्विस्ट व रंजक वळण आणून प्रेक्षकांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न करतात. गेल्या काही महिन्यांपासून टेलिव्हिजन टीआरपीत स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून मुक्ता-सागरच्या लग्नाच्या सीक्वेन्समुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका ‘ठरलं तर मग’ला चांगली टक्कर देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

नुकत्याच समोर आलेल्या टीआरपीच्या आकडेवारीनुसार ६.९ रेटिंगसह सायलीची ‘ठरलं तर मग’ अव्वलस्थानी, तर ६.८ रेटिंगनुसार मुक्ताची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे फक्त थोड्याशा फरकाने अव्वल क्रमांकासाठी या दोन मालिकांमध्ये जोरदार चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
t Plus zero transaction system
आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
Pune and Pimpri Chinchwad may raise PMPML ticket prices due to rising operational deficit
पीएमपी तिकीट दरवाढीचे भवितव्य, ‘दादांच्या ‘ हाती, काय निर्णय घेणार ?
atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?
Dombivli tax arrears people, Dombivli property seal,
डोंबिवलीत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या गाळ्यांना टाळे

हेही वाचा : Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेत ‘असा’ शूट झाला प्रतिमाच्या अपघाताचा सीन, सेटवरचा BTS व्हिडीओ पाहून नेटकरी झाले थक्क!

टीआरपीच्या यादीत तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या स्थानी अनुक्रमे ‘लक्ष्मीच्या पावलांनी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ व ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिका आहेत. विशेष म्हणजे पहिल्या दहा स्थानांवर सगळ्या स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिका आहेत. यानंतर थेट १४ व्या क्रमांकावर झी मराठीच्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला स्थान मिळालं आहे.

हेही वाचा : रोहित शेट्टीच्या नव्या सीरिजमध्ये सुचित्रा बांदेकरांसह ‘या’ मराठी कलाकारांनी वेधलं लक्ष, ‘इंडियन पोलीस फोर्स’चा ट्रेलर प्रदर्शित

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका १७ व्या स्थानी, तर १९ व्या स्थानावर ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका आहे. हार्दिक जोशीच्या नुकत्याच सुरू झालेल्या ‘जाऊ बाई गावात’ या शोला प्रेक्षकांची पसंती मिळत असून टीआरपीच्या यादीत या कार्यक्रमाचा २० वा क्रमांक लागतो.

Story img Loader