Tharala Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन आश्रमात जाऊन मधुभाऊंच्या केससंदर्भात पुरावे शोधणार असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. महिपत आणि साक्षी शिखरे थेट न्यायाधीशांशी हातमिळवणी करून वात्सल्य आश्रम पाडण्यासाठी हालचाली सुरू करतात. याविरोधात अर्जुन कोर्टात जातो. पण, तिथेही आश्रमावरचा स्टे हटवून, तो पाडण्यासाठी परवानगी दिली जाते. यानंतर अर्जुनला न्यायाधीश आणि महिपत शिखरेची हातमिळवणी झाल्याचं लक्षात येतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्जुन ( Tharala Tar Mag ) ऐनवेळी काही मुद्दे कोर्टात मांडतो. “आश्रमात खून झाल्याने तो लगेच तुम्ही पाडू शकत नाही. मला एक दिवस द्या. कायद्यानुसार आश्रम पाडल्यास तिथला मुख्य पुरावा नष्ट होईल… त्यामुळे मी एका दिवसात पुरावा शोधण्यासाठी अशा एका व्यक्तीला आश्रमात घेऊन जाणार ज्याला या आश्रमाचा कानाकोपरा माहिती आहे. ती व्यक्ती म्हणजे मधुभाऊंची लेक आणि माझी बायको मिसेस सायली अर्जुन सुभेदार.” असं अर्जुन कोर्टात सांगतो. तो कायद्याच्या बाजूने असल्याने त्याला आणखी विरोध करणं शक्य नसतं आणि त्याला कोर्टातून वात्सल्य आश्रमाची पाहणी करण्यासाठी परवानगी दिली जाते.

हेही वाचा : Video : प्रथमेश परबचा बायकोसह ‘झापुक झुपूक’ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकऱ्यांना आठवला सूरज चव्हाण, व्हिडीओ व्हायरल

अर्जुनला आश्रमात कोणता पुरावा सापडणार?

अर्जुन, सायली आणि चैतन्य असे तिघे मिळून आश्रमात जातात. पण, दुसरीकडे प्रियाच्या मनात धाकधूक सुरू होते. अर्जुन ९ ते ३ या वेळेत पुरावा शोधणार म्हणजे त्याला नक्कीच काहीतरी मिळेल याची पुरेपूर खात्री प्रियाला असते आणि तिचा अंदाज अखेर खरा ठरतो. अर्जुन-चैतन्य मिळून संपूर्ण आश्रमाची पाहणी करत असतात. एवढ्यात दरवाजात उभ्या असलेल्या सायलीला काहीतरी दिसतं…ती पटकन अर्जुनला आवाज देते. अर्जुन जवळ जाऊन जमिनीवर पडलेला एक टॅग ( Tharala Tar Mag ) उचलतो.

अर्जुनच्या हाती मोठा पुरावा ( Tharala Tar Mag )

अर्जुनच्या हाती लागलेला हा टॅग ‘प्रितीज बुटिक’ या कंपनीचा असतो. यावर चैतन्य लगेच म्हणतो, “आश्रमातलं कोणीही एवढ्या महागड्या बुटिकचे कपडे वापरणार नाही. साक्षी असे डिझायनर कपडे घालायची आणि आपण साक्षी इथे आल्याचे पुरावे शोधतोय ना? मग कशावरून हे कार्ड तिचं नसेल?” चैतन्यने उपस्थित केलेले प्रश्न लक्षात घेऊन अर्जुन-सायलीला देखील तो कपड्याचा टॅग साक्षीचा असावा असा संशय येतो.

हेही वाचा : ऑनस्क्रीन अन् ऑफस्क्रीन सासूबाई! फोटो शेअर करत शिवानी रांगोळे म्हणते, “या दोघी माझ्या…”

अर्जुनला हा टॅग सापडणं म्हणजे साक्षी आश्रमात आल्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोर्टात अर्जुन संपूर्ण बाजी पलटून टाकू शकतो. या पुराव्यामुळे वात्सल्य आश्रम पाडण्यासाठी पुन्हा एकदा स्टे दिला जाणार की, महिपतला स्टे हटवून आश्रम पाडण्याची परवानगी मिळणार हे येत्या ( Tharala Tar Mag ) काळात स्पष्ट होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag arjun got big evidence against sakshi watch new promo sva 00