‘ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या नवरात्र उत्सवाचा सीक्वेन्स सुरू आहे. सायली रुग्णालयातून सुखरूप घरी परतल्यामुळे सुभेदारांच्या घरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे अर्जुनला हळुहळू सायलीवर असलेल्या प्रेमाची जाणीव होऊ लागली आहे, तर दुसरीकडे हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च अर्जुनने केल्यामुळे सायलीच्या मनात परकेपणाची भावना निर्माण झाली आहे.
हेही वाचा : ‘खतरों के खिलाडी’, ‘बिग बॉस’नंतर आता शिव ठाकरे गाजवणार ‘झलक दिखला जा’! ‘हे’ १० सेलिब्रिटी होणार सहभागी
गुंडांनी हल्ला केल्यावर अर्जुन सायलीला चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करतो. या उपचारांचं बिल जवळपास साडेदहा लाख होतं. सायली एका डायरीमध्ये हा संपूर्ण हिशोब लिहून ठेवते आणि अर्जुनने केलेल्या मदतीबद्दल त्याचे आभार मानते. सायलीचं बोलणं ऐकून अर्जुन जोरात डायरी आपटतो आणि निघून जातो. अर्जुन असं का वागला याचं कारण शेवटपर्यंत सायलीला कळत नाही.
हेही वाचा : “मुंबईका किंग कौन…” हंसल मेहतांच्या ‘स्कॅम २००३ – तेलगी स्टोरी’च्या पार्ट २ चा टीझर प्रदर्शित
दुसरीकडे किल्लेदारांच्या घरात प्रिया नागराजची महिपतला भेटण्यासाठी समजूत काढत असते. परंतु, शेवटपर्यंत नागराज प्रियाचं ऐकत नसतो. २० वर्षांपूर्वी ३ लोकांना मारायला सांगितलं होतं तेवढंही त्याला जमलं नाही असं बोलून नागराज महिपतला दोष देत असतो. तेवढ्यात खोलीत रविराज किल्लेदार येतो. तो प्रिया आणि नागराजचं काहीच बोलणं ऐकत नाही केवळ प्रिया म्हणजेच खोट्या तन्वीने लग्न करावं असा त्याचा हट्ट असतो.
हेही वाचा : Video : “तुम्हाला रील बनवण्याचे पैसे दिले नाही” प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर वैतागला दिग्दर्शक, कारण…
सायलीने सांगितलेला हिशोब ऐकून अर्जुन सायलीसाठी एक पत्र लिहितो. त्यात तो तुम्हाला पैसे परत द्यायचे असते, तर मला देखील तुम्ही माझ्या कुटुंबासाठी जेवढं काही करता आहात त्याची परतफेड करावी लागेल असं लिहून ठेवतो. अर्जुनचं पत्र वाचून सायली भावुक होते. अर्जुनला हळुहळू सायलीवरच्या प्रेमाची जाणीव होत असल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे. परंतु, सायलीच्या मनात अजूनही परकेपणाची भावना आहे. तसेच पूर्णा आजीदेखील सायलीने अर्जुनच्या आयुष्याचा सत्यानाश केला असा दोष तिला देत त्यामुळे येत्या काळात सायली-अर्जुनचं नातं कोणतं वळण घेणार हे आगामी भागांमधून स्पष्ट होईल.