Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत मधुभाऊ जेलमधून सुटले असून आता अर्जुन-सायली एकमेकांसमोर त्यांचं प्रेम केव्हा व्यक्त करणार हा सीक्वेन्स चालू आहे. अर्जुन ‘वात्सल्य’ आश्रमाची केस लढण्याकरता सायलीशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पद्धतीने लग्न करतो. हे कॉन्ट्रॅक्ट मधुभाऊंची तुरुंगातून सुटका झाल्यावर संपुष्टात येणार असतं. पण, आता हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत आणि मिसेस सायली सुभेदारांचं घर सोडून निघून जाव्यात अशी अर्जुनची अजिबातच इच्छा नसते. त्यामुळे आता लवकरात लवकर आपल्या मनातील भावना बायकोसमोर व्यक्त करायच्या असं अर्जुन ठरवतो.

अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, केससाठी दोघंही प्रेमाचं नाटक करत आहेत असा गैरसमज एवढे दिवस प्रियाचा असतो. पण, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात असल्याचं प्रियासमोर उघड झालेलं आहे. त्यामुळे आता अर्जुन-सायली ( Tharala Tar Mag ) वेगळे कसे होतील यासाठी प्रिया अनेक प्रयत्न करताना दिसतेय.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Kaun Banega Crorepati Season 16 Amitabh Bachchan says I neither keep cash nor visit an ATM
KBC 16 : अमिताभ बच्चन ATM मध्ये कधीच गेले नाहीत, जया बच्चन यांच्याकडून घेतात पैसे, म्हणाले…
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”

हेही वाचा : ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेला ११ वर्ष पूर्ण! प्राजक्ता माळीने शेअर केली खास पोस्ट, म्हणाली, “ही मालिका माझ्या पदरात…”

अर्जुन-सायली प्रेम व्यक्त करू शकतील का?

सायलीसमोर प्रत्यक्ष प्रेम व्यक्त करण्याची हिंमत अर्जुनमध्ये नसते. यामुळे मिस्टर सुभेदार लाडक्या बायकोला पत्र लिहिण्याचा प्लॅन बनवतात. ते पत्र वाचून सायली लाजली तर मी समजून जाईन, तिच्याही मनात काहीतरी आहे असं अर्जुन ठरवतो. पण, प्रियामुळे त्याचा हा प्लॅन सुद्धा निष्फळ ठरतो. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेचे चाहते सुद्धा अर्जुन-सायली एकमेकांना आपल्या मनातील भावना केव्हा सांगणार याची आतुरतेने वाट पाहात आहेत. आता अखेर तो क्षण लवकरच येणार आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीने याचा प्रोमो ( Tharala Tar Mag ) सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये रेस्टॉरंटच्या रोमँटिक माहोलमध्ये अर्जुन सायलीला प्रपोज करणार असल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेचं बॅकग्राऊंड गाणं सुरु असताना अर्जुनची एन्ट्री होती. सायली रेस्टॉरंटच्या टेबलवर नवऱ्याची वाट पाहत बसलेली असते. तिच्यासमोर गुलाब अन् चाफ्याची फुलं असतात. दोघेही एकमेकांकडे आतुर होऊन पाहतात आणि म्हणतात, ‘मला तुम्हाला काहीतरी सांगायचं’ यादरम्यान, अर्जुन त्याच्या खिशातून अंगठी सुद्धा आणतो. तो म्हणतो, “आय…” अन् इथेच प्रोमो संपतो. त्यामुळे आता एवढ्या रंजक वळणावर आल्यावर हे दोघंही प्रेम व्यक्त करणार का? हे पाहण्यासाठी मालिकेचे चाहते आतुर झाले आहेत.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला नेटकऱ्याने विचारलं ‘वय किती?’ अभिनेत्रीने थेट सांगितला आकडा…

नेटकऱ्यांनी ( Tharala Tar Mag ) या प्रोमोवर, “यावेळी सुद्धा काहीतरी होईल”, “हे पण खरं नसेल तर?”, “प्लीज आता तरी दोघांनी प्रेम व्यक्त करू द्या”, “आता काही ट्विस्ट नको”, “इसका मुझे था इंतजार” अशा कमेंट्स करण्यात आल्या आहेत.

Story img Loader