Tharala Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायलीच्या मनात मधुभाऊंच्या सुटकेवरून अर्जुनबद्दल गैरसमज निर्माण झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. मधुभाऊ जेलच्या बाहेर आल्यावर मिसेस सायली आपल्याला सोडून जाणार असं मत अर्जुन चैतन्यसमोर मांडतो. यावर चैतन्य त्याला “तू मधुभाऊंची सुटका करणं थोडं लांबव” असा सल्ला देतो. पण, मित्राचा हा सल्ला अर्जुनला पटत नाही. पण, या दोघांची अर्धवट चर्चा सायली ऐकते आणि नवऱ्याबद्दल गैरसमज करून घेते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सायली-अर्जुनमध्ये ( Tharala Tar Mag ) निर्माण झालेल्या गैरसमजाचा फायदा प्रिया उचलते आणि वकिलांना पैसे देऊन त्या दोघांच्या घटस्फोटाचे कागद बनवून घेते. पण, शेवटी सायली अर्जुनचा राग शांत करून त्याला सत्यपरिस्थिती सांगते. यामुळे दोघंही एकत्र येऊन प्रियाचं कारस्थान सर्वांसमोर उघडं करतात. एवढंच नव्हे तर सायली सुभेदार कुटुंबीयांसमोर प्रियाला सणसणीत कानाखाली देखील वाजवते. यावेळी रविराज किल्लेदार आणि प्रतिमा हे दोघंही तिथे उपस्थित असतात.

हेही वाचा : Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक

बाबांना पाहून सायलीला अश्रू अनावर

प्रियाचं प्रकरण संपल्यावर सायली अर्जुनला मधुभाऊंच्या केसचा जाब विचारते. “केस delay करणार याचा नेमका अर्थ काय सर? तुम्ही मुद्दा हे सगळं करत होतात, मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे वाीट असाल” असं ती नवऱ्याला म्हणते… यावर अर्जुन काहीसा गोंधळून जातो. कारण, घडलेल्या प्रकारात अर्जुनची काहीच चूक नसते. बायकोची समजूत काढण्यापेक्षा तो आता प्रत्यक्ष तिच्या मनाची इच्छा पूर्ण करून दाखवणार आहे.

‘ठरलं तर मग’ ( Tharala Tar Mag ) मालिकेत लवकरच दिवाळीचा सीक्वेन्स सुरू होणार आहे. सणाच्या निमित्ताने मालिकेत मधुभाऊंची रिएन्ट्री होणार आहे. तुळशीसमोर दिवा लावताना मधुभाऊ आपल्या लेकीला आवाज देतात. आपल्या वडिलांना सणाच्या दिवशी घरी परत आलेलं पाहून सायलीला प्रचंड आनंद होतो. ती धावत जाऊन मधुभाऊंना मिठी मारते. यादरम्यान ती प्रचंड रडत असते.

हेही वाचा : Video : निक्कीला भेटण्यासाठी मुंबईत आला घन:श्याम! अरबाजला चुकून ‘या’ नावाने मारली हाक अन्…; पुढे काय घडलं?

मधुभाऊ सायलीला सांगतात, “जावईबापूंनी मला जेलमधून सोडवून आणलंय.” यावर अर्जुन सायलीला म्हणतो, “तुम्हाला वाटतो तेवढा वाईट मी नाहीये” हे ऐकताच सायली पटकन नवऱ्याला मिठी मारते. दोघांचं हे प्रेम पाहून मधुभाऊंचे डोळे सुद्धा भरून येतात. ‘ठरलं तर मग’ ( Tharala Tar Mag ) मालिकेचा हा विशेष भाग १३ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजता प्रसारित केला जाणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag arjun rescue madhu bhau from the jail sayali emotional watch new promo sva 00