Tharala Tar Mag Marathi Serial Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुनला प्रियाच्या वागणुकीवर संशय आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. गणेशोत्सवानिमित्त प्रतिमा, रविराज आणि प्रिया म्हणजेच खोटी तन्वी हे तिघं मिळून बाप्पाची प्रतिष्ठापना करतील असं पूर्णा आजीने ठरवलेलं असतं. मात्र, ऐनवेळी प्रियाचा डाव तिच्यावरच उलटतो आणि ती झोपून राहते. त्यामुळे बाप्पाची आरती सायली, प्रतिमा आणि रविराज किल्लेदारांच्या हस्ते पार पडते. यादरम्यान, प्रियाच्या चुकीच्या वागणुकीमुळे रविराज तिला सगळ्यांसमोर कानाखाली मारतात आणि सुनावतात.

खरंतर, सायली हीच खरी तन्वी आणि प्रतिमा-रविराज यांची मुलगी असते. हे सत्य प्रिया सोडून कोणालाच माहिती नसतं. याचाच गैरफायदा घेऊन प्रिया किल्लेदारांच्या घरात प्रवेश करते. प्रिया स्वत:च्या पायावर सायलीसारखी हुबेहूब जन्मखूण काढते आणि तिच खरी तन्वी असल्याचा बनाव रचते. आता लवकरच हे सत्य अर्जुनसमोर येणार आहे.

suraj chavan
सूरज चव्हाणने अशोक सराफ यांना दिल्या गुलीगत शुभेच्छा; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “झापूक झुपूक पॅटर्नमध्ये…”
Marathi actress Vishakha Subhedar share special post for television day
“आजवर या प्रवासात…”, विशाखा सुभेदारच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं…
bigg boss marathi aarya jadhao slams nikki tamboli
लठ्ठपणावरुन टीका अन् फुटेजचा आरोप…; आर्या निक्कीवर संतापली! म्हणाली, “तुला मारून घराच्या बाहेर…”
Navri Mile Hitlarla
“जसं दिसतं तसं नसतं”, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील ‘त्या’ सीनचे असे होते शूटिंग; पाहा व्हिडीओ
Ata Houde Dhingana 3
आता होऊ दे धिंगाणा : आई आणि मुलीच्या नृत्याची जुगलबंदी…; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’फेम अभिनेत्रींचा डान्स पाहिलात का?
gharoghari matichya chuli fame Reshma Shinde share kelvan photos
फुलांची सुंदर सजावट, पंचपक्वान्न, आहेर अन्….; मराठी कलाकारांनी रेश्मा शिंदेचं ‘असं’ केलं केळवण, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…
namrata sambherao writes romantic post for husband Yogesh sambherao
“आयुष्यभर असाच रुबाबदार…”, नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची रोमँटिक पोस्ट! म्हणाली…
aai kuthe kay karte
संजनाने रचला नवीन डाव! अरुंधतीच्या फायनल रेकॉर्डिंगमध्ये विघ्न येणार? पाहा मालिकेचा प्रोमो
Popular director Chandrakant kanse share special post for actor Sameer paranjape
“लाज लज्जा सोडून, कोणाची ही तमा न बाळगता…”, समीर परांजपेसाठी लोकप्रिय दिग्दर्शकाने लिहिलेली पोस्ट होतेय व्हायरल, वाचा

हेही वाचा : Video : “कभी कपडे फाडे गये, कभी नोचा गया…”, घराबाहेर येताच आर्याने रॅपमधून मांडलं रोखठोक मत! एकदा ऐकाच…

सुमन काकीमुळे अर्जुनसमोर येणार सत्य

रविराजने कानाखाली मारल्यावर प्रिया अर्जुनसमोर प्रतिमाबद्दल चुकीच्या गोष्टी बोलते. कोणतीही मुलगी आपल्या आईबद्दल एवढं चुकीचं बोलणार नाही त्यामुळे प्रिया ही तन्वी असल्याचं केवळ नाटक करतेय असा संशय अर्जुनला येतो. याबद्दल तो सायलीला देखील सांगतो. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी अर्जुन सुमनकडे जातो. तो काकींची भेट घेण्यासाठी येतो आणि विचारतो, “सुमन काकू तुम्हाला मानलं पाहिजे. प्रियाच तन्वी आहे…हे जे काय तुम्ही ओळखलंय ना मस्तच!”

‘ठरलं तर मग’ ( Tharala Tar Mag ) मालिकेत पहिल्यापासून सुमनचा स्वभाव अगदी साधाभोळा दाखवण्यात आला आहे. ती लगेच दुसऱ्यांच्या बोलण्यात गुंतून जाते. त्यामुळे अर्जुनला सुद्धा ती अगदी झटकन उत्तर देते. “अहो सोपं आहे. तन्वीच्या उजव्या पायावर जन्मखूण नाहीये का? त्यावरूनच तर मी तिला ओळखलं” असं उत्तर सुमनने देताच “आता काही करून ही जन्मखूण शोधायची” असं अर्जुन ठरवतो. यानंतर तो घरी येतो.

हेही वाचा : Video: ऐश्वर्या राय बच्चनला मिळाला पुरस्कार, लेक होती सोबतीला; कधी किस करताना तर कधी फोटो काढताना दिसली आराध्या

Tharala Tar Mag
अर्जुन बघणार सायलीच्या पायावरची जन्मखूण ( Tharala Tar Mag )

अर्जुन रुममध्ये आल्यावर पाहतो तर, सायली बेडवर झोपलेली असते आणि तिच्या उजव्या पायाच्या तळव्यावर जन्मखूण असते. ती खूण पाहिल्यावर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आपली बायको सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य लवकरच अर्जुनसमोर येणार आहे. आता प्रियाचा ( Tharala Tar Mag ) खोटेपणा तो कसा उघड करणार आणि रविराज किल्लेदारांना याबद्दल कसं सांगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.