‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायली-अर्जुनमध्ये प्रेम बहरत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. या जोडप्याचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याने दोघेही फक्त मधुभाऊ आश्रम केसचा निकाल लागेपर्यंत एकत्र राहायचं असं ठरवतात. परंतु, सायलीचा समजूतदारपणा पाहून अर्जुन हळुहळू तिच्या प्रेमात पडतो. आता तशीच भावना सायलीच्या मनात देखील निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मालिकेच्या गेल्या काही भागांमध्ये चैतन्य आणि अर्जुनमध्ये पराकोटीचे वाद झाल्याचं आपण पाहिलं. साक्षी आपल्या मित्राची कोणत्याही प्रकारे फसवणूक करू नये हा अर्जुनचा एकमात्र उद्देश असतो. परंतु, साक्षीच्या जाळ्यात ओढल्या गेलेल्या चैतन्यचा कोणावरच विश्वास नसतो. एकीकडे दोन मित्रांचे हे वाद सुरू असताना, दुसरीकडे अर्जुन-सायलीचं नातं आणखी घट्ट होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Maharashtrachi Hasya Jatra inside rehearsal video
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘अशी’ होते रिहर्सल! शिवालीने केलं भन्नाट ‘टंग ट्विस्टर’, मालवणी भाषा अन्…; पाहा व्हिडीओ

हेही वाचा : शाहरुख खानकडून मराठमोळ्या निलेश साबळेने घेतली ‘ही’ प्रेरणा, किस्सा सांगत भाऊ कदमांशी जोडलं खास कनेक्शन

सायली-अर्जुन लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र डेटवर जाणार आहेत. यावेळी नायिका चक्क स्कूटरवरून अर्जुनला १५ मिनिटांच्या डेटवर नेणार आहे. आता या डेटमध्ये काय खास असणार याचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : “मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून…”, चिन्मय मांडलेकर ट्रोलिंग प्रकरणावर पुष्कर श्रोत्रीचं स्पष्ट मत; म्हणाला, “इतिहास चाचपडून बघा”

मालिकेच्या समोर आलेल्या नवीन प्रोमोमध्ये अर्जुन सायली एकत्र वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय या दोघांनी डेटवर जाऊन खास ‘मुंबई पुणे मुंबई’ चित्रपटातील “कधी तू…” या लोकप्रिय गाण्यावर रोमँटिक डान्स केला. या नव्या प्रोमोचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, गेली अनेक वर्षे प्रेक्षक सायली-अर्जुनमध्ये प्रेम केव्हा बहरणार याची वाट पाहत होते. अखेर मालिकेत या ट्रॅकला आता सुरुवात झालेली आहे. दोघेही एकत्र आल्यावर त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Story img Loader