Tharala Tar Mag New Episode : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रियासमोर अर्जुनने सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन प्रियाशी प्रेमाचं नाटक करत होता. मात्र, ऐनवेळी अर्जुनचा डाव उलटला आणि प्रियाला पायावरची जन्मखूण पाहण्यासाठी अर्जुन हे नाटक करत असल्याची जाणीव झाली. सुभेदारांच्या घरात कोणीही नसताना प्रिया अर्जुनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते मात्र, एवढ्यात भडकलेला अर्जुन तिला दूर करतो आणि माझं फक्त सायलीवर प्रेम आहे असं ओरडून तिला सांगतो. हे सगळं पडद्याआड उभी असलेली सायली ऐकते आणि तिचा आनंद गगनात मावेनासा होतो.

सायली-अर्जुन या दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम असतं. मात्र, अद्याप या दोघांनी एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. या दोघांचं लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पद्धतीने झालेलं असतं. त्यामुळे एकमेकांसमोर प्रेमाची कबुली कशी द्यायची असा विचार करून अर्जुन-सायलीने आजवर मौन बाळगलेलं असतं. अशातच प्रियासमोर अर्जुनने प्रेमाची कबुली दिल्यामुळे सायली प्रचंड आनंदी होते. घरातील कोणत्याच कामात तिचं लक्ष लागत नसतं. अखेर आता या सगळ्यात एक नवीन ट्विस्ट ( Tharala Tar Mag ) येणार आहे.

Ankush Chaudhari as Police officer
अंकुश चौधरी पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत; ‘पी. एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील लूक पोस्टर रिलीज
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Premachi Goshta
Video: आदित्यला मिळवलं मात्र सईला गमावलं? सावनीच्या कारस्थानापुढे मुक्ताचं ममत्व जिंकणार…; पाहा प्रोमो
tula shikvin changalach dhada adhipati big misunderstanding about wife akshara
अधिपतीचा अक्षराबद्दल मोठा गैरसमज! ‘ते’ दृश्य पाहताच होणार राग अनावर, नव्या अभिनेत्याच्या एन्ट्रीमुळे मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
amit bhanushali birthday on set villain priya new look grabs attention
Video : ‘ठरलं तर मग’च्या सेटवर अर्जुनच्या वाढदिवसाची धमाल! खलनायिका प्रियाच्या नव्या लूकने वेधलं लक्ष, मिळाली मोठी हिंट
tharla tar mag wedding sequence who will arjun marry sayali or priya
‘ठरलं तर मग’ मालिकेत लगीनघाई! सायली अन् प्रिया दोघींच्या हातावर सजणार मेहंदी…; अर्जुनचं लग्न कोणाशी होणार?
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…
Tharla Tar Mag New Promo
ठरलं तर मग : सायलीला विसरा…; पूर्णा आजीने घातला अर्जुन अन् प्रियाच्या लग्नाचा घाट, नातवाला म्हणाली…

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “तुझं बाहेर लफडं असेल…”, अखेर अरबाज-निक्की आले समोरासमोर! कोटवरील ‘त्या’ नावाने वेधलं लक्ष

सायली सुद्धा अर्जुनसमोर मनातील भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेते मात्र, घाबरलेल्या अर्जुनची बायकोसमोर बोबडी वळते. कॉन्ट्रॅक्टमध्ये दोघांपैकी एक जरी कोणी पहिलं प्रेमात पडलं, तर दुसरा व्यक्ती त्याला सोडून जाणार असं लिहिलेलं असतं. त्यामुळे “प्रियाला खरं वाटावं यासाठी मी तुमच्यावर प्रेम असल्याचं सांगितलं…सध्या तुमच्याबद्दल भावना नाहीत” असं उत्तर घाबरून अर्जुन सायलीला देतो. अर्जुनचं आपल्यावर प्रेम नाही, सगळं फक्त नाटक होतं हे समजल्यावर सायली प्रचंड दु:खी होते. तिला फार रडू येतं.

हेही वाचा : ‘बिग बॉस मराठी’ने रचला इतिहास! शेवटच्या आठवड्यात रेकॉर्डब्रेक TRP; ‘कलर्स मराठी’ने शेअर केली खास पोस्ट

Tharala Tar Mag
‘ठरलं तर मग’ मालिकेचा नवीन प्रोमो ( Tharala Tar Mag )

प्रियाचा नवीन डाव

दुसरीकडे, प्रिया या सगळ्याचा विशेषत: अर्जुन-सायलीचा ( Tharala Tar Mag ) बदला घेण्यासाठी नवं कारस्थान रचते. आता पूर्णा आजी आणि रविराज किल्लेदार यांना सांगून प्रिया प्रतिमाला घेऊन म्हणजेच आपल्या आईसह स्वगृही परतण्याची मागणी करणार आहे. यामुळे प्रतिमा-सायलीची ताटातूट होईल… आता पूर्णा आजी प्रियाच्या या निर्णयाला होकार देणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader