‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायली अर्जुनवर चिडून कुसुम ताईंकडे निघून गेल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. एकीकडे सायली-अर्जुनचं गोड भांडण सुरु असताना मालिकेत दुसरीकडे प्रतिमाच्या अपघाताचं रहस्य उलगडत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात महिपतने प्रतिमाचा खून केल्याची कबुली प्रिया व नागराजसमोर दिली. परंतु, या अपघातामधून प्रतिमा सुखरुप कशी बचावली याचा खुलासा आगामी भागांमध्ये करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सायली ही प्रतिमा व रविराज किल्लेदारांची लेक असते. याशिवाय तिचं खरं नाव सायली नसून तन्वी असं आहे. परंतु, सध्या मालिकेत प्रिया खोटी तन्वी बनून वावरत आहे. त्यामुळे सायलीला तिचा भूतकाळ व बालपण केव्हा आठवणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच सध्या सुभेदारांच्या घरात सायली-अर्जुनची गोड भांडणं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पण, अर्जुनच्या सततच्या रागाला कंटाळून सायली कुसुम ताईंकडे निघून गेल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात पाहायला मिळालं.

हेही वाचा : Irrfan Khan : त्याचं जाणं चटका लावून गेलं, ‘या’ मराठी अभिनेत्याने इरफान खानवरून ठेवलंय लाडक्या लेकीचं नाव

सूनबाई अर्जुनला धडा शिकवण्यासाठी घर सोडून गेल्याने तिची सासू कल्पना काहीशी नाराज होते. तिला सतत सायलीची आठवण येत असते. अर्जुनला देखील बायकोशिवाय अजिबात करमत नसतं. त्यामुळे तो सायलीची समजून काढून तिला पुन्हा घरी आणण्याचा निर्णय घेतो.

ऑफिसमधून अर्जुन थेट कुसुम ताईंच्या घरी सायलीला आणायला जातो. लाडक्या बायकोची समजूत काढण्यासाठी तो खास योजना बनवतो. “सॉरी मिसेस सायली मला प्लीज माफ करा” असा संदेश तो एका कागदाच्या पुठ्ठ्यावर लिहितो आणि हाच पुठ्ठा घेऊन कुसुम ताईंच्या घराबाहेर उभा राहतो. अर्जुन माफी मागत असल्याचं पाहून सायली मनातल्या मनात हसते.

हेही वाचा : ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीचा ध्वनी प्रदूषणामुळे संताप, पोस्ट शेअर करत म्हणाली, “माईकवरून भसाड्या आवाजात…”

आता सायली अर्जुनबरोबर पुन्हा सुभेदारांकडे जाणार का? की, कुसुम ताईंकडेच राहणार? प्रतिमाच्या अपघाताच्या रहस्याचा अर्जुन-सायलीच्या नात्यावर काय परिणाम होणार? याचा उलगडा ११ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या विशेष भागात होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag arjun subhedar special plan to convince his wife after fight watch new promo sva 00