‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायली-अर्जुनच्या हनिमूनचा सीक्वेन्स चालू आहे. सासूबाई कल्पना मुलाला व सुनेला सरप्राईज देण्यासाठी माथेरानला पाठवते. माथेरानला एकत्र वेळ घालवल्यानंतर अर्जुनला सायलीवरच्या प्रेमाची जाणीव होते. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्जुन-सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं असल्याने दोघेही एकत्र हनिमूनला न जाता फ्रेंड्समूनला जाण्याचा निर्णय घेतात. परंतु, प्रिया कारस्थान रचून सायलीच्या ज्यूसमध्ये दारू मिसळते. सायली देखील कोणताही विचार न करता तो ज्यूस पिते व पार्टीत सगळीकडे अर्जुनला शोधू लागते. पुढे, अर्जुन बायकोला सावरतो आणि सायलीसमोर प्रेमाची कबुली देतो. मात्र, तेव्हा ती शुद्धीत नसते. आता सायलीच्या प्रत्यक्ष समोर अर्जुन प्रेम व्यक्त करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : आमिर खानच्या चित्रपटात झळकणार देशमुखांची सून! जिनिलीया पोस्ट शेअर करत म्हणाली, “१६ वर्षांनी…”

माथेरानहून परत मुंबईला आल्यावर अर्जुन घडला प्रकार सांगण्यासाठी चैतन्यकडे जातो. चैतन्य व अर्जुन अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. त्यामुळे सायलीबद्दलच्या भावनांविषयी सगळ्यात आधी अर्जुनला चैतन्यला सांगायचं असतं. दुसरीकडे, अण्णा बाहेरगावी गेल्याचं सांगून आधीच चैतन्यकडे साक्षी शिखरे राहायला आलेली असते.

हेही वाचा : नोकरी करताना झाला त्रास, बाळासाहेब ठाकरेंना कळालं अन्…; गश्मीर महाजनीच्या आईने सांगितला प्रसंग, म्हणाल्या, “मीनाताईही…”

चैतन्य व साक्षी या दोघांना एकमेकांच्या मिठीत पाहून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. वात्सल्य आश्रमाच्या केसमध्ये साक्षी कशी सर्वांची फसवणूक करतेय याची जाणीव तो चैतन्यला करून देण्याचा प्रयत्न करतो. परंतु, चैतन्य ‘माझं आणि साक्षीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि लवकरच लग्न करणार आहोत’ असा निर्णय अर्जुनला सांगतो. अर्जुनच्या जवळच्या मित्राने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे मालिकेचं कथानक आता कोणत्या दिशेला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

साक्षी-चैतन्यबद्दल समजल्यावर अर्जुन भविष्यात चैतन्यबरोबर काम करेल का? दोघांच्या मैत्रीत या निर्णयामुळे दुरावा येईल का आणि वात्सल्य आश्रमाच्या पुराव्यासंदर्भात यापुढे अर्जुनची भूमिका काय असेल? याचा उलगडा ११ फेब्रुवारीच्या विशेष भागात होणार आहे. हा विशेष भाग रविवारी दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.