Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रिया अर्जुन-सायलीमध्ये गैरसमज निर्माण करून फूट पाडणार असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. अर्जुन दिवाळीच्या मुहूर्तावर जेलमधून मधुभाऊंची सुटका करतो. आपल्या वडिलांना घरी आलेलं पाहून सायली प्रचंड आनंदी होते. पण, कॉन्ट्रॅक्टनुसार आता तिला सुभेदारांचं घर सोडायला लागणार असतं. मधुभाऊंची सुटका ज्या दिवशी होईल, त्या दिवशी हे दोघंही वेगळे होणार असतात. मात्र, मनातून दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत.
सुभेदारांचं घर सोडून जाऊ लागू नये यासाठी सायली विविध प्रयत्न करताना दिसतेय…तर, दुसरीकडे मिसेस सायली कायमस्वरुपी इथेच राहाव्यात यासाठी अर्जुन सुद्धा लवकरात लवकर तिच्यासमोर प्रेमाची जाहीर कबुली द्यायची असा विचार करत असतो. सायलीसमोर प्रेम व्यक्त करण्याचा तो एकदा प्रयत्न सुद्धा करतो पण, या दोघांच्या वाटेत कायम काही ना काही अडचणी येत असल्याचं प्रेक्षकांना ( Tharala Tar Mag ) पाहायला मिळतं.
आता सायली-अर्जुनच्या प्रेमात आड येणार आहे ती म्हणजे प्रिया. तिला पहिल्या दिवसापासून अर्जुन-सायलीला वेगळं करून स्वत:ला सुभेदारांची सून म्हणवून घ्यायचं असतं. यासाठी प्रिया आता दोघांमध्ये गैरसमज निर्माण करणार आहे. एकीकडे ती नवनवीन डाव रचत असताना दुसरीकडे अर्जुन लवकरात लवकर मनातल्या भावना कशा व्यक्त करायच्या या विचारात असतो.
अर्जुन चैतन्यला सांगून आपलं प्रेम सायलीसमोर व्यक्त करण्यासाठी तिला खास चिठ्ठी लिहितो. हे पत्र डायनिंग टेबलवर ठेवून तो लपून बायकोकडे पाहत असतो. काही करून मिसेस सायलींनी पत्र वाचावं आणि त्या लाजतील म्हणजे मला माझं उत्तर मिळेल या विचारात अर्जुन असतो.
“माझी ही चिठ्ठी वाचून मिसेस सायली लाजल्या, हसल्या म्हणजे माझ्या प्रेमाची केस क्लोज…” असं अर्जुन चैतन्यला सांगतो. यानंतर डायनिंग टेबलजवळ आलेली सायली ती चिठ्ठी वाचते. पण, हसून लाजण्यापेक्षा ते पत्र वाचून तिच्या चेहऱ्यावरचा रंग काहीस उडल्याचं या नव्या प्रोमोमध्ये ( Tharala Tar Mag ) पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : लठ्ठपणावरुन टीका अन् फुटेजचा आरोप…; आर्या निक्कीवर संतापली! म्हणाली, “तुला मारून घराच्या बाहेर…”
आता अर्जुनने ठेवलेली मूळ चिठ्ठी प्रियाने बदलली अशा चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू आहेत. आता खरंच चिठ्ठी प्रिया बदलणार की, अर्जुन सायलीसमोर आपलं प्रेम व्यक्त करण्यात यशस्वी होणार हे मालिकेच्या ( Tharala Tar Mag ) आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल.