Tharala Tar Mag New Track : ‘ठरलं तर मग’ मालिकेत मधुभाऊंची जेलमधून सुटका होऊन ते पुन्हा एकदा घरी परतल्याचा सीक्वेन्स चालू आहे. यंदा मधुभाऊंनी आपल्या लाडक्या लेकीच्या सासरी दिवाळी साजरी केली. वडिलांच्या परत येण्याने सायली देखील प्रचंड आनंदी असते. पण, दुसरीकडे अर्जुनच्या मनात आता मधुभाऊ बाहेर आलेत, त्यामुळे सायली कॉन्ट्रॅक्टनुसार मला सोडून निघून जाणार अशी भावना येते. आता लवकरात लवकर आपण सायलीसमोर प्रेम व्यक्त केलं पाहिजे असा अर्जुनचा प्रयत्न असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिवाळी पाडव्याच्या दिवशी सायली अर्जुनचं औक्षण करते. आपल्या लेकीचा आनंद पाहून मधुभाऊ सायलीची सासू कल्पनाला सांगतात माझ्या लेकीची अन् जावयाची नजर काढा. हे सगळं सुरू असताना सायली-अर्जुनच्या मनात आपण लवकरात लवकर एकमेकांप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं पाहिजे अशी भावना येते. आता येत्या भागात अर्जुन सायलीसमोर आपलं प्रेम व्यक्त कसं करायचं याचा सराव करत असतो. हे सगळं प्रिया चोरून ऐकते.

हेही वाचा : Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : ‘भूल भुलैया ३’ ‘सिंघम अगेन’ चित्रपटावर झाला वरचढ, तिसऱ्या शनिवारी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

अर्जुनच्या मनातील भावना चोरून ऐकणारी प्रिया म्हणते, “अर्जुनचं सायलीवर खरं प्रेम आहे. आता अर्जुन तुझं हेच खरं प्रेम…तुझ्या खोट्या कॉन्ट्रॅक्टसारखं मी खोटं ठरवेन.” हा नवीन ट्रॅक आता प्रेक्षकांना मात्र ‘बोअर’ होऊ लागला आहे. या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.

“आता मालिका खूप बोअर होतेय”, “ठरलं तर मग- ठरवून ताणलेली मालिका”, “सायलीच खरी तन्वी आहे हे आधी दाखवा”, “आता परत त्या दोघांचं एकमेकांना सांगायचं राहून जाणार… तुम्ही त्यांची love life दाखवणार आहात का नाही?”, “मालिका खरंच खूप बोअर होतेय आता”, “नुसता टाइमपास सुरू आहे”, “लेखकांनी कृपया या कमेंट्सची नोंद घ्यावी” अशा कमेंट्स मालिकेच्या प्रोमोवर आल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स ( Tharala Tar Mag )

हेही वाचा : नव्या मालिकांची मांदियाळी! ‘स्टार प्रवाह’वर पुनरागमन करतेय ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री, जाहीर केली मालिकेची वेळ अन् तारीख…

आता प्रियाचा डाव यशस्वी होऊन तिला अर्जुन-सायलीला वेगळं करण्यात यश मिळणार की, ती पुन्हा एकदा तोंडावर पडणार हे मालिकेच्या आगामी भागांमध्ये स्पष्ट होणार आहे.