‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायली १५ मिनिटांच्या डेटवर गेल्याचा सीक्वेन्स चालू आहे. अर्जुनच्या रियुनियन पार्टीला गेल्यावर सायली त्याच्या आवडीनिवडी जाणून घेते आणि लाडक्या नवऱ्याला स्कूटरवर मागे बसवून डेटवर नेते. लग्नानंतर पहिल्यांदाच अर्जुन-सायली डेटवर गेल्याचं पाहायला मिळालं. आता हळुहळू मालिकेत या दोघांचं नातं बहरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सायली-अर्जुनचं नातं वेगळ्या वळणावर जात असतानाच चैतन्य एक मोठा निर्णय घेऊन सुभेदारांना धक्का देणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चैतन्य बालपणीच्या मित्राची म्हणजेच अर्जुनची साथ सोडून साक्षी शिखरेबरोबर राहत आहे. साक्षी केस संदर्भातील पुराव्यांसाठी चैतन्यचा फक्त वापर करण्यासाठी त्याला स्वत:च्या जाळ्यात ओढते. चैतन्यला प्रेमापोटी एकटी साक्षीच खरी वाटत असते.

हेही वाचा : जगभरात धुमाकूळ घालणारं ‘गुलाबी साडी’ गाणं कधी लिहिलं? जळगावचा संजू राठोड म्हणतो, “दिवाळीच्या दिवशी…”

साक्षीवरच्या प्रेमापोटी आणि तिला वात्सल्य आश्रम केसमधून मुक्त करण्यासाठी चैतन्य साक्षीशी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतो. हा निर्णय कळवण्यासाठी तो सुभेदारांकडे जातो. चैतन्यचं बालपणापासून संपूर्ण संगोपन कल्पना, प्रताप, पूर्णा आजी यांनी केलेलं असतं. त्यामुळेच अर्जुन व त्याच्या कुटुंबीयांना साखरपुड्याचा निर्णय सांगण्यासाठी चैतन्य त्यांच्या घरी येतो.

हेही वाचा : सुरुची अडारकरच्या वाढदिवसानिमित्त पियुष रानडेची खास पोस्ट; बायकोबद्दल म्हणाला, “तुझ्या प्रेमामुळे…”

चैतन्यला अचानक आलेलं पाहून सगळेजण आश्चर्य व्यक्त करतात. यावर तो म्हणतो, “मला लहानपणापासून इतर कोणी नाही. पण, तुम्ही सर्वांनी मला नेहमी आधार दिलात. त्यामुळे माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय सांगण्यासाठी मी तुमच्याजवळ आलो आहे. माझा नवीन प्रवास तुमच्या आशीर्वादाशिवाय पूर्ण होणार नाही. मी ( चैतन्य) आणि साक्षी साखरपुडा करतोय.”

चैतन्यचा निर्णय ऐकून अर्जुन-सायलीसह सुभेदार कुटुंबीयांना मोठा धक्का बसतो. मालिकेचा हा नवीन प्रोमो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. आता चैतन्य आणि साक्षीचा साखरपुडा खरंच होणार की, अर्जुन त्याआधीच पुरावे मिळवून चैतन्यला सावध करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Story img Loader