स्टार प्रवाहवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या एका रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. साक्षीबरोबर साखरपुडा करणार असल्याची बातमी देऊन चैतन्यने सुभेदार कुटुंबाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. एका बाजूला अर्जुन आणि सायली चैतन्यला साक्षीचा खरा चेहरा दाखवू पाहतात, तर दुसरीकडे चैतन्य साक्षीबरोबर संसार थाटण्याच्या तयारीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झालाय. चैतन्य साक्षीच्या साखरपुड्याला सुभेदार कुटुंबासह अर्जुन आणि सायलीदेखील हजेरी लावतात हे पाहून चैतन्य खूप खूश होतो. अर्जुन आणि सायली चैतन्यला एका खोलीत घेऊन जातात आणि साक्षीच्या विरोधातील पुरावे त्याला दाखवतात. याचा चैतन्यला खूप मोठा धक्का बसतो. “मी हा साखरपुडा मोडतोय”, असं चैतन्य दोघांना सांगतो; परंतु तेवढ्यात सायली त्याला अडवते आणि म्हणते, “आजवर साक्षीने तिच्या सोयीनुसार तुमचा वापर केला, आता आपण एकत्र येऊन तिला धडा शिकवूया.”

हेही वाचा… “दोनवेळचं जेवण मिळायचं नाही”, अभिजीत खांडकेकरने सांगितला पहिल्या मालिकेतील ‘तो’ अनुभव, म्हणाला…

आता याच संदर्भात चैतन्यने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये जसे पर्यायी उत्तर देऊन प्रश्न विचारतात, तसाच एक प्रश्न चैतन्यने चाहत्यांना विचारला आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ची म्युझिक या व्हिडीओला जोडत, “आता मी काय करू?” असा प्रश्न त्याने चाहत्यांना विचारला आहे. या प्रश्नाला अ. ब. क. ड. असे चार पर्याय चैतन्यने दिले आहेत.

अ. साक्षीबरोबर साखरपुडा करू का?

ब. अर्जुनबरोबर पुन्हा एकत्र येऊ?

क. या दोघांपासून लांब पळून जाऊ?

ड. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या चाहत्यांकडून मार खाऊ?

ठरलं तर मग चाहत्यांसाठी, हा आहे तुमचा प्रश्न.
जर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर तुम्हाला पन्नास एपिसोड्सची मानसिक शांती मिळेल. लवकरात लवकर उत्तर द्या किंवा दुसरा काही पर्याय असेल तर तो सुचवा. सर्वोत्तम कमेंट पिन केली जाईल”, असं कॅप्शन चैतन्यने या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा… ठरलं तर मग: अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य आलं साक्षीसमोर; चैतन्य खुलासा करत म्हणाला “ते खरे नवरा बायको…”

चैतन्यचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “जर तू अर्जुनबरोबर पुन्हा एकत्र नाही आलास तर पर्याय दे”. तर दुसऱ्याने लिहिलं, “यातला कोणताच पर्याय नाही, तू तुझी स्क्रिप्ट फॉलो कर.”

हेही वाचा… चेहऱ्यावरील केसांमुळे ट्रोल झालेल्या प्राची निगमला ‘या’ अभिनेत्याने दिला पाठिंबा; पोस्ट शेअर करत म्हणाला, “मला तुझा अभिमान…”

दरम्यान, चैतन्यला साक्षीचा खरा चेहरा कळल्यानंतर आता चैतन्य काय पाऊल उचलेल याची प्रतीक्षा प्रेक्षकांना आहे. चैतन्य साक्षीबरोबर साखरपुडा करेल का? पुढे काय होईल? हे येत्या काही भागांमध्ये स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag chaitanya questions fans about engagement with sakshi after sayali arjun reveals truth dvr