‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडेच या मालिकेला एक वळणं आलं आहे. या मालिकेतील बहुप्रतिक्षित प्रतिमा या पात्राची आता एंट्री झाली आहे. पण आता प्रतिमाची मुलगी म्हणजेच तन्वी नेमकी कोण? सायली की प्रिया? यामागचं सत्य मालिकेच्या येत्या भागांमध्ये उलगडणार आहे. शिवाय लवकरच ‘ठरलं तर मग’मध्ये मंगळगौरीचा खेळ पाहायला मिळणार आहे. सध्या यासंबंधीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आलं आहे. अशात जुईच्या एका कौतुकास्पद उत्तरानं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – राखी सावंतविरोधात खास मैत्रिणीनं केला एफआयआर दाखल; म्हणाली, “लवकरच…”

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Paaru
“तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्वीकारणार आहात?”, श्रेया बुगडेच्या प्रश्नावर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणाल्या…
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”

नुकतंच जुईनं ‘मज्जा’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तिला विचारलं की, ‘जेव्हा केव्हा तुझी मंगळागौर होईल, तेव्हा तुझ्या मंगळागौरीला हे व्हायलाचं पाहिजे, अशी वाटणारी ती गोष्ट आहे?’ यावर जुई म्हणाली की, “माझ्या आयुष्यातल्या कुठल्या गोष्टी असतील किंवा काही प्रसंग असेल तर मला विधवा महिलांना नेहमी दान द्यायची खूप इच्छा असते. प्रत्येक वेळेला मी असं करते.”

हेही वाचा – ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री दिसणार नव्या भूमिकेत, लवकरच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत घेणार एन्ट्री

पुढे जुई म्हणाली की, “मंगळगौर हा विवाहित महिलांचा सण आपण म्हणतो. पण जेव्हा माझी मंगळागौर असेल, तेव्हा ज्या विधवा महिला किंवा अविवाहित महिला असतील, अशा सगळ्यांना बोलवून मी मंगळागौर खेळेन. माझ्या मनात ती गोष्ट नेहमी सतावत असते की, त्यांना आपण कुठे कधी बोलवतं नाही. त्यामुळे माझ्या जवळच्या ज्या विधवा महिला असतील किंवा अविवाहित महिला असतील त्यांच्याबरोबर मी मंगळागौर साजरी करेन.”

हेही वाचा – “जर दिग्दर्शक व्हायचं असेल तर….” अभिनेता चिन्मय मांडलेकरनं दिला मोलाचा सल्ला, म्हणाला…

दरम्यान, जुई गडकरी मालिकांव्यतिरिक्त ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात झळकली होती. या पर्वात तिच्याबरोबर ‘पुढचं पाऊल’मध्ये सोहमच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता आस्ताद काळेसुद्धा झळकला होता.

Story img Loader