मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. अलीकडेच इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याच्या दुर्घटनेवर अभिनेत्रीने दुःख व्यक्त केलं होतं. त्यानंतर तिनं दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. जीवनावश्यक वस्तू गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जुईने घेतली. त्यामुळे तिच्या या कामाच कौतुक केलं गेलं. अशातच जुईने तिला कोणत्या गोष्टीला अधिक घाबरते? याचा खुलासा केला आहे.

‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या जुई गडकरीने आपल्या अभिनयानं वेगळी छाप उमटवली आहे. त्यामुळे सध्या तिची ‘ठरलं तर मग’ ही मालिकाही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील जुईच्या सायली या पात्रानं प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. जुई ही प्राणीप्रेमी असल्याचं हे सर्वांनाच माहित आहे. पण असं असतानाही अभिनेत्री फुलपाखरांना घाबरत असल्याचं तिनं स्वतः सांगितलं आहे.

हेही वाचा – “तब तक के लिये.. अलविदा”; ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अभिनेत्रीच्या पोस्टने वेधले लक्ष; म्हणाली…

‘अल्ट्रा मराठी बझ’ या एण्टरटेन्मेंट मीडियाबरोबर बोलताना जुईने याचा खुलासा केला. अभिनेत्री म्हणाली की, “मला फुलपाखरांचा फोबिया आहे. फुलपाखरू जवळ आलं तरी मी संपून जाते. मला भयंकर फुलपाखरांची भीती आहे. पाल, सरडा, साप यांना मी हाताने उचलू शकते. पण फुलपाखरू जवळ दिसलं की, माझ्यातली शक्तीच निघू जाते.” त्यानंतर तिनं तिच्याबरोबर घडलेला एक किस्सा सांगितला.

हेही वाचा – नम्रता संभेरावसाठी ‘या’ अभिनेत्रीने बनवला खास चहा; पाहा व्हिडीओ

हेही वाचा – कोरोना, ब्रेनस्ट्रोक अन् पॅरेलिसिसची शिकार; शाहरुख खानबरोबर झळकलेल्या अभिनेत्रीने ‘अशी’ केली गंभीर आजारावर मात

पुढे जुई म्हणाली की, “कर्जतला दिवाळीत घरी खूप फुलपाखरं येतात. लहान नाही तर मोठे-मोठे फुलपाखरं येतात. ते घरात आले की, मी त्यांच्याकडेच बघतं बसलेली असते. एकेदिवशी तर मी फुलपाखराला घाबरून पडले होते. तेव्हा आई म्हणाली होती, जुईचं फुल आहे ना. त्यावर फुलपाखरं येणारचं.”

Story img Loader