‘ठरलं तर मग’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशालीने मुख्य भूमिका साकारली आहे. सध्या या मालिकेच्या सेटवर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. जुई गडकरी लहानपणापासून उत्तम मोदक बनवता येतात. त्यामुळे यंदा ‘ठरलं तर मग’च्या सेटवर जुईने खास मोदक बनवले होते. सेटवरचा BTS व्हिडीओ अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “मी तुमची पूर्वीपासून चाहती” मिसेस मुख्यमंत्र्यांचे ‘हे’ शब्द ऐकताच सुकन्या मोने सुखावल्या; सांगितला ‘वर्षा’वरील अनुभव

जुई गडकरीचं बालपण कर्जतमध्ये गेलं. ती अनेक वर्षांपासून परंपरेनुसार बाप्पाला आवडतात असे उकडीचे मोदक तिच्या घरी बनवते. यंदा अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवर सर्वांना मोदक बनवून दिले. मोदक बनवण्यासाठी तिला संपूर्ण टीमने मदत केली. मालिकेत जुईच्या सासूची भूमिका करणाऱ्या प्राजक्ता दिघे अर्थात कल्पना सुभेदार, विमल, अस्मिता यांनी मिळून सेटवर मोदकांचा बेत केला होता.

हेही वाचा : Video “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”; सोनाली कुलकर्णीने दिला बाप्पाला निरोप, व्हिडीओ व्हायरल

जुई गडकरी हा व्हिडीओ शेअर करत लिहिते, “एकत्र मोदक बनवणारी टीम कायम एकत्र असते. अनंत चतुर्थीच्या शुभेच्छा! बाप्पा, तुला तर सगळंच माहितेय! पुढच्या वर्षी लवकर ये आणि माझ्याकडून भरपूर सेवा करुन घे. बाकी काही मागणं नाही!!! फक्त तुझ्या पायाशी राहुदे”

हेही वाचा : Video: “मालिका बंद करा”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले; नेमकं काय घडलं?

दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने, “मस्त बनवले आहेत मोदक…मी प्रयत्न करेन.” दुसऱ्या एका युजरने, “आम्हाला पण द्या खायला सायलीच्या हातचे उकडीचे मोदक…” तसेच आणखी काही युजर्सनी कमेंटमध्ये “अस्मिता ताई तुमचा इथेही तुम्हाला पिछा सोडत नाही.” असं म्हटलं आहे. दरम्यान, प्रेक्षकांमध्ये ‘ठरलं तर मग’ मालिकेचा गणेशोत्सव विसर्जन भाग पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या भागात सायलीवर चाकूने हल्ला होणार असल्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag fame actress jui gadkari shared bts video of making modak sva 00