स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ‘बालदिन’ १४ नोव्हेंबरला साजरा केला जातो. त्यामुळे आज सोशल मीडियावर सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण आपल्या बालपणीचे फोटो शेअर करून बालदिनाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. आपल्या आवडत्या कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या बालपणीच्या आठवणी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.

सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. आता अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो चर्चेत आला आहे. या अभिनेत्रीने छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ या मालिकेत ‘चंदा’ ही सहायक भूमिका साकारत या अभिनेत्रीने मालिका विश्वात पदार्पण केलं होतं. परंतु, ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे अभिनेत्री रातोरात प्रसिद्ध झाली.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
shraddha aarya new born baby photo
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर
marathi actress hemal ingle kelvan photos
थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर

हेही वाचा : Video : “मराठी पोरी…”, शिवानी सुर्वेचा बॉयफ्रेंडबरोबर जबरदस्त डान्स, ‘झिम्मा २’ मधील गाण्यावर थिरकली अभिनेत्री

फोटो दिसणारी ही चिमुकली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून लोकप्रिय मराठी अभिनेत्री जुई गडकरी आहे. बालदिनाच्या निमित्ताने जुईने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे अभिनेत्रीचं खऱ्या अर्थाने नशीब बदललं. ‘पुढचं पाऊल’ ही मालिका २ मे २०११ मध्ये प्रसारित झाली. पुढे जवळपास ७ वर्ष या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

हेही वाचा : ‘या’ चिमुकल्यांना ओळखलंत का? सध्या प्रेक्षकांच्या मनावर गाजवतायत अधिराज्य

‘पुढचं पाऊल’नंतर अभिनेत्रीने जुईने ‘बिग बॉस’ मराठी आणि ‘वर्तुळ’ मालिकेमध्ये काम केलं. त्यानंतर अचानक ओढवलेल्या आजारपणामुळे तिला कलाविश्वातून ब्रेक घ्यावा लागला. मोठ्या ब्रेकनंतर जुईने ‘ठरलं तर मग’ या मालिकेद्वारे दमदार पुनरागमन केलं. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे याशिवाय ही मालिका गेल्या महिन्यात महाराष्ट्राची नंबर एक मालिका ठरली होती. त्यामुळे जुईने छोट्या पडद्यावरची नंबर १ सून अशी कलाविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Story img Loader