अभिनेत्री जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. यामध्ये जुईने ‘सायली’ हे पात्र साकारलं आहे. याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मालिकेच्या सेटवरचे अनेक अपडेट्स ती इन्स्टाग्रामवर शेअर करते.

हेही वाचा : Video : “कोकणातील संस्कृती, केळीच्या पानावर जेवण अन्…”, लोकप्रिय मालिकेच्या सेटवर बसली कलाकारांची पंगत, पाहा व्हिडीओ…

जुईने ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ या मालिकेद्वारे कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं परंतु, तिला स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे जुई घराघरांत लोकप्रिय झाली आणि छोट्या पडद्यावरची लाडकी सूनबाई ठरली. ही मालिका जवळपास ७ वर्ष सुरू होती. त्यानंतर काही काळ जुईने प्रकृतीच्या कारणास्तव मालिका विश्वातून ब्रेक घेतला होता. अनेक दिवसांच्या ब्रेकनंतर गेल्यावर्षी ‘ठरलं तर मग’या मालिकेतून जुईने जोरदार पुनरागमन केलं.

हेही वाचा : Video माझा फोटो घेऊन काय करणार? हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद पापाराझींवर चिडली, म्हणाली…

‘ठरलं तर मग’मालिकेत ऑनस्क्रीन सर्वांची आईसारखी काळजी घेणाऱ्या सायलीने नुकताच ऑफस्क्रीन खऱ्या आईबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. “तुमच्या आईबरोबरचा सुंदर फोटो शेअर करा” या इन्स्टाग्राम टास्कमध्ये, जुईने तिची आई नेत्रा गडकरी यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला.

जुई गडकरी व तिची आई नेत्रा गडकरी

jui
जुई गडकरी

हेही वाचा : “शिक्षा भोगणं…”, संजय दत्तला आठवले तुरुंगातील दिवस; म्हणाला, “ग्रंथ वाचन, स्वयंपाक अन्…”

दरम्यान, जुईच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर सायलीवर झालेल्या हल्ल्यामुळे अर्जुन-सायलीच्या नात्यात कोणतं नवं वळण देईल? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तसेच आगामी भागांमध्ये मालिकेत प्रतिमा म्हणजेच शिल्पा नवलकर यांची एन्ट्री होणार असल्याचा प्रोमो नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.