‘ठरलं तर मग’ या मालिकेला गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मालिकेत येणारे नवनवे ट्विस्ट आणि रंजक वळण यामुळे प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “तुम्ही भेटलात अन्…”, सलील कुलकर्णींची लाडक्या अशोक मामांसाठी खास पोस्ट; म्हणाले, “शांत, प्रांजळ, मिश्किल…”

मालिकेत आईपासून दुरावलेल्या सायलीचं संपूर्ण बालपण अनाथ आश्रमात गेलेलं असतं. सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य केवळ तिची आई प्रतिमाला माहिती असतं. आता लवकरच ‘ठरलं तर मग’ या मालिकेत प्रतिमाची एन्ट्री होणार आहे. प्रतिमाची भूमिका ‘बाईपण भारी देवा’ फेम अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी साकारली आहे.

हेही वाचा : “पाटील म्हणतो नाव घे बाई…”, ‘हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने भर कार्यक्रमात घेतला हटके उखाणा, ऐकून व्हाल थक्क

शिल्पा नवलकर यांनी प्रतिमाच्या भूमिकेसाठी लागणाऱ्या खास मेकअपचा पडद्यामागचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रतिमाचा अपघात झालेला आणि भाजलेला लूक दाखवण्यासाठी अभिनेत्रीला खास प्रोस्थेटिक मेकअप करण्यात आला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शिल्पा नवलकर लिहितात, “काही क्षणांसाठी दिसणाऱ्या भाजल्याच्या खुणा दाखवण्यास मागे असणारी मेहनत!! ‘ठरलं तर मग’ मालिका स्टार प्रवाहवर पाहात राहा.”

हेही वाचा : “तरुणपणी खूप उद्दाम होतं, म्हातारं झालं आणि लाचार…”, गश्मीर महाजनीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

शिल्पा नवलकर यांनी शेअर केलेला BTS व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी “बापरे! तुला खरंच सलाम आहे” अशी कमेंट लाडक्या मैत्रिणीच्या व्हिडीओवर केली आहे. तर एका युजरने, “खूप मेहनत आणि जोखमीचं काम आहे तुम्हाला अनेक शुभेच्छा असं कमेंटमध्ये म्हटलं आहे.” दरम्यान, ‘ठरलं तर मग’मध्ये सध्या किल्लेदार प्रतिमाचा शोध घेत आहेत. त्यांच्यासमोर प्रतिमा येणार का? सायली आणि प्रतिमाची भेट होणार का? हे आगामी एपिसोड्समध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag fame actress shilpa navalkar shared bts video of prosthetic makeup sva 00