‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळीच उंची गाठली आहे. अभिनेत्री जुई गडकरी व अभिनेता अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक अटळ स्थान निर्माण केलं आहे. गेल्या दीड वर्षांपासून ‘ठरलं तर मग’ मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर कायम टिकून आहे. अशा या महामालिकेतील कलाकार मंडळी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अविरत काम करत आहेत. भर उन्हातही काम करताना दिसत आहे. याचा व्हिडीओ अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी केलं फोटोशूट, म्हणाली, “बालपणीचा…”

“आउटडोअर शूटिंग..उष्णतेची लाट…मेहनत का पसीना है भाई”, असं कॅप्शन लिहित अभिनेता अमित भानुशालीने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अर्जुन (अमित भानुशाली) बरोबर कल्पना (प्राजक्ता कुलकर्णी-दिघे) आणि पूर्णाआजी (ज्योति चांदेकर) पाहायला मिळत आहेत. भर उन्हात, घामाच्या धारा येत असूनही तिघं शूट करताना दिसत आहेत. तिघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील मास्तरीण बाईंनाही लागलं ‘हीरामंडी’चं वेड, ‘एक बार देख लीजिए’ गाण्यावर केलं कथ्थक नृत्य

हेही वाचा – Video: ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाच्या परीक्षणाची धुरा संकर्षण कऱ्हाडे व अमृता खानविलकरच्या हाती, सूत्रसंचालन करणार ‘ही’ अभिनेत्री

अमित भानुशालीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “तुमची मालिका खूप छान आहे. सायली आणि तुम्ही छान अभिनय करता”, “खरंच खूप गरमी आहे…काळजी घ्या”, “तुमचा अभिनय खूप असतो”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. तसंच आउटडोअर शूटिंग असल्यामुळे अनेकजण विचारत आहेत की, “पुढे काहीतरी नवीन घडणार का? आम्हाला सांगा.”

हेही वाचा – मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या ‘मुंज्या’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई, दोन दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

मालिकेत सध्या काय सुरू आहे?

‘ठरलं तर मग’ मालिकेचा आज महाएपिसोड आहे. या महाएपिसोडमध्ये पूर्णाआजींला सायलीमध्ये प्रतिभाचा भास होताना पाहायला मिळणार आहे. प्रतिभाची साडी सायलीने नेसल्यामुळे तिच्याकडे पाहून पूर्णाआजींना वाटतं की, अजूनही प्रतिभा जिवंत आहे. त्यामुळे पूर्णाआजी प्रतिभाच्या फोटोला हार घालू देत नाही. त्यामुळे आता पुढे आणखी काय-काय घडणार? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag fame amit bhanushali share offscreen video pps